Amazon वर हिंदूंच्या श्रद्धा दुखावणाऱ्या पुस्तकाची विक्री; मुखपृष्ठावर कालीमातेचे अपमानास्पद चित्र

92

जगातील सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने (Amazon) हिंदूंच्या धार्मिक भावना पुन्हा एकदा दुखावल्या आहेत. ॲमेझॉनवर ‘काली मा: ए कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज’ (Kali Ma: A Collection of Short Stories) नावाचे पुस्तक विकत आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर कालीमातेचे चित्र आहे. यामध्ये कोट्यवधी हिंदूंनी पूज्य मानलेल्या कालीमातेला फासावर लटकलेले दाखवले आहे.

(हेही वाचा – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची १०० कोटींची मालमत्ता जप्त; ED ची कारवाई)

कालीमाता शाक्त परंपरेतील दशमहाविद्यांपैकी एक मानले जाते. असंख्य भक्तांच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या कालीमातेला ज्या अपमानजनक मुद्रेत दाखवले आहे. त्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

दशकांपासून हिंदूंच्या भावनांशी खेळ

हिंदूंच्या भावनांशी खेळण्याचा हा वाद आजपासून नाही. मां कालीचा अपमान करणाऱ्या या पुस्तकावरून मे २०२३ मध्ये सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्या वेळी खूप चर्चा झाली, वादविवाद झाले. ना पुस्तकाची विक्री थांबली, ना ॲमेझॉनविरुद्ध कोणती कारवाई झाली.

‘काली मा: ए कलेक्शन ऑफ शॉर्ट स्टोरीज’ या पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की, यात मां कालीशी संबंधित कथा असतील. वस्तूस्थिती अशी नाही. केवळ प्रसिद्धीसाठी आणि आस्थेशी खेळण्यासाठीच या पुस्तकाला हिंदूंच्या आराध्य देवीचे नाव देण्यात आले आहे.

एल.टी. फुल्लाहने दाखवली हिंदूविरोधी मानसिकता

भयप्रद कथा विकण्यासाठी हिंदू देवीच्या प्रतिमेचा वापर होत आहे. हे लेखक, प्रकाशक आणि ते विकणाऱ्यांच्या हिंदूविरोधी मानसिकतेचा जिवंत पुरावा आहे. या पुस्तकाचे लेखक एल. टी. फुल्लाह (L. T. Fullah) आहे. फुल्लाह भारत आणि हिंदु धर्माचा जाणकार विद्वान नसून तो तपास सुरक्षा व्यावसायिक (Investigative Security Professional) राहिलेला आहे.

अमेरिकेत (America) रहाणाऱ्या फुल्लाहने हे पुस्तक विकण्यासाठी वादग्रस्त पद्धत अवलंबली आहे. ॲमेझॉन तर भारतात व्यवसाय करते. २०२२-२३ मध्ये ॲमेझॉनने भारतात सुमारे २७ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केला. ॲमेझॉनसारख्या कंपन्या मार्केट रिसर्चवर कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्यामुळे ॲमेझॉनला चांगलेच माहीत आहे की, भारतातील हिंदू भाविक या पुस्तकावर प्रश्न उपस्थित करतील. ही माहिती असूनही ॲमेझॉनने हे पुस्तक भारतात लॉन्च केले, इतकेच नाही तर २०२३ मध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही आस्थेवर आघात करणाऱ्या हे पुस्तक आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढले नाही.

  • २०२० मध्ये हिंदू देवी-देवतांची चित्रे असलेली आक्षेपार्ह उत्पादने ॲमेझॉनच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध करण्यात आली होती.
  • २०२१ मध्ये ॲमेझॉनच्या वेब सिरीज ‘तांडव’वर भगवान शिवच्या अपमानाचा आरोप लागला होता.
  • २०२२ मध्ये ॲमेझॉनवर हिंदू देवी-देवतांची चित्रे छापलेले महिलांचे आक्षेपार्ह पोशाख सूचीबद्ध करण्यात आले होते.
  • २०२३ मध्ये ॲमेझॉनने रक्षाबंधनाला ‘ब्रदर-सिस्टर डे’ म्हणून प्रचारित केले होते, यालाही विरोध झाला होता.
  • २०२४ मध्ये हळदी-कुंकू असलेली पूजेची थाळी ‘डेकोरेटिव्ह प्लेट’ म्हणून ॲमेझॉनवर विकली जात होती.

व्यावसायिक फायद्यासाठी हिंदू आस्थेवर आघात करणारी क्षुद्र कृत्ये अमेझॉनने सातत्याने केली आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही अशा मार्गदर्शक सूचना (Guidelines) तयार केल्या पाहिजेत जेणेकरून आस्थेला ठेच पोहोचवणारी उत्पादने भारताच्या बाजारात विकली जाऊ नयेत, अशी मागणी हिंदूंकडून सातत्याने होत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.