कोकणातील हापूसचा (Alphonso Mango) हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर कर्नाटक आंब्याचा हंगाम बहरला आहे. कर्नाटकातून आंब्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हापूसप्रमाणे चव असलेल्या कर्नाटकातील आंब्यांना मागील काही वर्षांपासून मागणी वाढली आहे. यंदा वातावरणातील बदलामुळे हापूसचे उत्पन्न कमी प्रमाणावर आले आहे.
(हेही वाचा PM Narendra Modi : दहशतवादाला पोसणारे पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी यांना एकाच नजरेत बघणार)
जून महिन्यापर्यंत कर्नाटकातील आंबा बाजारात उपलब्ध राहणार आहे. दरवर्षी कर्नाटकातील आंब्यांचा (Alphonso Mango) हंगाम १५ एप्रिलपर्यंत सुरू होतो. यंदा कर्नाटक आंब्यांचा हंगाम १५ दिवस उशिराने सुरू झाला आहे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात आवकही चांगली होत आहे. यंदा हापूसचा हंगाम लवकर संपणार आहे. देवगड, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून होणारी आंब्याची आवक कमी झाली आहे.
Join Our WhatsApp Community