Allahabad High Court Bollywood Notice : अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना मिळाली नोटीस; जाणून घ्या नेमके कारण काय ?

372
Allahabad High Court Bollywood Notice : अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना मिळाली नोटीस; जाणून घ्या नेमके कारण काय ?

काही दिवसांपूर्वी ऑनलाईन गेमिंगच्या जाहिरातीमुळे अनेक बॉलीवूड कलाकार (Allahabad High Court Bollywood Notice) अडचणीत आले होते. अशातच आता पुनः एकदा जाहिरातीमुळे बॉलीवूडचे प्रमुख तीन कलाकार अडचीत सापडले आहेत.

सविस्तर माहितीनुसार, अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court Bollywood Notice) लखनौ खंडपीठाने शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. बॉलीवूड किंग शाहरुख खान , खिलाडी अक्षय कुमार आणि सिंघम अजय देवगण या तिघांनी मिळून ‘गुटखा’ कंपनीची जाहिरात केल्याने त्यांना ही नोटिस बजावण्यात आली आहे.

(हेही वाचा – Sukhdev Singh Murder Case : दिल्ली पोलिसांना मोठं यश; मध्यरात्री तीन आरोपींना अटक)

लखनऊ खंडपीठाने याची माहिती केंद्र सरकारला दिली आहे. यावर उत्तर देतांना (Allahabad High Court Bollywood Notice) केंद्र सरकारच्या वकिलाने सांगितले की, “केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाच्या वतीने शाहरुख खान आणि अजय देवगण यांना ऑक्टोबर महिन्यात नोटीस बजावण्यात आली आहे, आणि सध्या सर्वोच्च न्यायालयाकडूनही याची सुनावणी केली जात आहे. त्यामुळे तात्काळ तुमची याचिका फेटाळली जावी.”

याच पार्श्वभूमीवर लखनऊ खंडपीठाने (Allahabad High Court Bollywood Notice) या प्रकरणाची सुनावणी ९ मे २०२४ रोजी निश्चित केली आहे.

(हेही वाचा –  Weather Update : राज्यात पुढील काही दिवस रंगणार थंडी आणि पावसाचा खेळ)

न्यायमूर्ती राजेश सिंग चौहान (Allahabad High Court Bollywood Notice) यांच्या खंडपीठाने याचिकेत नमूद केले आहे की २२ ऑक्टोबर रोजी सरकारला निवेदन देण्यात आले होते, परंतु या प्रकरणात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही किंवा निवेदनावर निर्णय घेण्यात आला नाही, त्यानंतर, अवमान याचिकेवर सुनावणी करताना, उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस बजावली होती ज्यानंतर डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, केंद्र सरकारने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण या तीन अभिनेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.