pandharpur wari 2023 : सोमवारी पुण्यात पालख्यांचे आगमन; कोणते रस्ते होणार बंद; घ्या जाणून…

सोमवारी १२ जून रोजी पुणे शहरात पालख्या दाखल होणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होणार असून शहरात सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

205

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सोमवारी, १२ जून रोजी होणार आहे. यासाठी या दोन्ही पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. पालखी साेहळ्यानिमित्त शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून यंदा लाइव्ह लोकेशन सुविधेचा वापर करण्यात येणार आहे.

श्री ज्ञानेश्वरमहाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन, तसेच पालखी मार्गस्थ होत असताना शहरातील रस्ते बंद करण्यात येतात. वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी पालखी मार्गावरील प्रमुख चौक आणि रस्ते टप्प्याटप्प्याने वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे.

लाइव्ह लोकेशन सुविधेमुळे पालखी सोहळ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध होईल, तसेच वाहतुकीचे नियोजनही करणे शक्य होणार आहे. सोहळ्यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. diversion.punepolice.gov.in या लाइव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे.

(हेही वाचा 72 hooren : स्टुडिओमध्ये ‘टीव्ही शो’च्या दरम्यान धर्मांध शोएब जमईची महिलेने केली धुलाई)

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रस्ते बंद

नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी, १२ जून रोजी दुपारी १२ नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा बुधवार, १४ जून रोजी सकाळी शहरातून मार्गस्थ होणार आहे.

वाहतुकीस बंद असणारे रस्ते (कंसात पर्यायी मार्ग)

  • गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग – रेंजहिल्स – खडकी पोलीस ठाणे पोल्ट्री चौक, जुना मुंबई – पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता
  • फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स
  • शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता
  • टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल
  • लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.