Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा शंभराव्या नाट्यसंमेलनाला फटका; मुहूर्तमेढ लांबणीवर

आंदोलनामुळे सुधीर गाडगीळांचा राजीनामा

108

मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. (Maratha Reservation) आतापर्यंत अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. शासनाने पुन्हा पुन्हा आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. बुधवार, १ नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक घेऊन सरकारने आरक्षणासाठी प्रयत्नांची दिशाही निश्चित केली आहे. आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नसल्याची भूमिका पुन्हा मनोज जरांगे यांनी घेतली आहे. आता या आरक्षणाची झळ थेट नाट्यसंमेलनाला देखील बसली आहे.

येत्या ५ नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढिचा कार्यक्रम (Maratha Reservation) स्थगित करण्यात आला आहे. नाट्यसंमेलन स्वागताध्यपदी असणाऱ्या सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी आंदोलनामुळे राजीनामा दिला आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद)

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 5 नोव्हेंबरपासून नाट्यपंधरी असलेल्या सांगलीत होणार होतं. यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. तथापि, राज्यभर उसळलेल्या मराठा आंदोलनामुळे हे सर्व कार्यक्रम तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आहे. (Maratha Reservation)

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की,”मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर सुरू असेलल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्यनशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत नाही”.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.