Air pollution: महाराष्ट्रातील ‘हे’ शहर वायू प्रदूषणाच्या विळख्यात, भारतातील १० शहरांचा समावेश; वाचा सविस्तर

'लँसेट प्लॅनेटरी हेल्थ'मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, वरील १० शहरांतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आढळून आले आहे.

133
Air pollution: महाराष्ट्रातील 'हे' शहर वायू प्रदूषणाच्या विळख्यात, भारतातील १० शहरांचा समावेश; वाचा सविस्तर

नागरी वसाहती, पायाभूत सोयी-सुविधा, कारखानदारी, रस्ते बांधणी यामुळे परिसरातील हिरवळीचा पट्टा कमी होत चालला आहे. यामुळे वायू प्रदूषण वाढत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत. ज्या प्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे.

रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानीकारक ठरत आहे. दिल्लीमध्ये दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमधील जवळपास ११.५ टक्के म्हणजेच १२,००० मृत्यू हे वायू प्रदूषणामुळे होत आहेत. लँसेटच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये दिल्लीचा सर्वात प्रथम क्रमांक लागतो.

(हेही वाचा – Champions Come Home : दीड महिन्यांनी मायदेशात परतल्यावर खेळाडूंनी कशावर ताव मारला?)

वायू प्रदूषणात वाढ झालेली प्रमुख शहरे…
भारतातील १० शहरांमध्ये जवळपास ७ टक्के मृत्यू वायू प्रदुषणामुळे होत आहेत. तर वर्षभरात जवळपास ३३ हजार लोकांना वायू प्रदूषणाला बळी पडावे लागत आहे, असाही दावा लँसेटच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतातील अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे, शिमला आणि वाराणसी या प्रमुख शहरांचा समावेश होतो. यापैकी शिमलामध्ये वायू प्रदूषणाला बळी पडणाऱ्यांची सर्वात कमी संख्या आहे. या ठिकाणी वर्षभरात केवळ ५९ मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाले आहेत.

मृत्यूच्या नोंदी?
‘लँसेट प्लॅनेटरी हेल्थ’मध्ये सदर अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. अहवालानुसार, वरील १० शहरांतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हवेच्या गुणवत्तेबाबत पीएम २.५ ची जी मर्यादा आखून दिली आहे, त्यापेक्षा अधिक प्रमाण असल्याचे अहवालात म्हटले आहे. संशोधकांनी सदर निष्कर्ष काढण्यासाठी २००८ ते २०१९ या वर्षातील मृत्यूच्या नोंदी तपासल्या. या शहरांतील ३.६ दशलक्ष मृत्यूच्या कारणांची तपासणी केली गेली. त्यातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.

दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषण…
वायू प्रदूषणामुळे मुंबईत दरवर्षी ५१००, बंगळुरूमध्ये २,१००, चेन्नईत २,९०० आणि कोलकातामध्ये ४,७०० लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात कमी वायू प्रदूषण हिमाचल प्रदेशच्या शिमलामध्ये आढळून आले आहे. दऱ्याखोऱ्यातही वायू प्रदूषणाची समस्या आता जाणवू लागली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.