Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले. यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. (Air India Plane Crashed) या घटनेत जीवितहानी संदर्भात अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. हे प्रवासी विमान टेक ऑफ करतानाच कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. एअर इंडियाचे हे विमान लंडनला जात होते. मात्र त्याआधीच या विमानाचा अपघात झाला. या विमान एकू 242 प्रवासी प्रवास करत होते. (Air India Plane Crash)
Flight AI171, operating Ahmedabad-London Gatwick, was involved in an incident today, 12 June 2025. At this moment, we are ascertaining the details and will share further updates at the earliest on https://t.co/Fnw0ywg2Zt and on our X handle (https://t.co/Id1XFe9SfL).
-Air India…
— Air India (@airindia) June 12, 2025
दरम्यान, या विमान अपघातावर एअर इंडियाने (Air India tweet) आता स्पष्टीकरण देत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अहमदाबाद ते लंडन गॅटविक या विमानाने उड्डाण घेतलेली फ्लाइट AI171 हे गुरुवार, 12 जून 2025 रोजी एका दुर्घटनेत या विमानाचं अपघात झाला. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स http://airindia.com आणि आमच्या X हँडलवर (https://x.com/airindia) शेअर करू, अशी माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे. एअर इंडियाचे प्रवक्ते यांनी आपल्या अधिकृत X हँडलवर ही माहिती दिली आहे.
(हेही वाचा – Air India Plane Crashed : अहमदाबादमध्ये कोसळले प्रवासी विमान; परिसरात धुराचे लोट)
विमानात एकूण 242 प्रवासी
पुढे आलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया बी 787 ड्रीमलाइनर विमान,एआय 171 (AI171) सेक्टर अहमदाबाद ते लंडन (गॅटविक) विमानतळ, दुपारी 1.38 वाजता एका निवासी भागात (मेघनी नगर) कोसळले होते. उड्डाणानंतर 5 मिनिटांनी हे विमान कोसळले. यावेळी पायलट इन कमांड सुमित सभरवाल, सह-पायलट क्लाईव्ह कुंदर यांच्यासह विमानात 230 प्रवासी होते. तसेच क्रू स्टाफ 10 आणि 2 पायलट असे एकूण 242 प्रवासी या विमानात असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
Air India confirms that flight AI171, from Ahmedabad to London Gatwick, was involved in an accident today after take-off.
The flight, which departed from Ahmedabad at 1338 hrs, was carrying 242 passengers and crew members on board the Boeing 787-8 aircraft. Of these, 169 are…
— Air India (@airindia) June 12, 2025
भारतीय प्रवाशांसह ‘या’ परदेशी नागरिकांचा समावेश
१६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी आम्ही १८०० ५६९१ ४४४ हा एक समर्पित प्रवासी हॉटलाइन क्रमांक देखील सुरू केला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community