Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार

Air India Plane Crash : कंपनीने सेवेत काही बदल करण्याचं ठरवलं आहे. 

44
Air India Plane Crash : एअर इंडिया मोठ्या विमानांचा वापर १५ टक्क्यांनी कमी करणार
  • ऋजुता लुकतुके

एअर इंडिया कंपनीने अहमदाबाद विमान अपघातानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवाय या अपघातानंतर मागच्या आठवडाभरात कंपनीला आपली आणखी तीन आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं एकतर रद्द करावी लागली किंवा दुसरीकडे वळवावी लागली. कंपनीच्या विमानांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे सेवा विलंबाने होतेय. अशावेळी एअर इंडियाने आपल्या आंतरराष्ट्रीय मार्गांवर मोठी विमानं वापरण्याचं प्रमाण १५ टक्क्यांनी कमी करण्याचं ठरवलं आहे. (Air India Plane Crash)

सध्या जागतिक स्तरावर मध्य-पूर्व आशियात भूराजकीय तणाव आहे. इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकण्याची लक्षणं आहेत. तर युरोपमध्ये अनेक देशांनी रात्रीच्या वेळी हवाई उड्डाणांवर मर्यादा घातल्या आहेत. अशावेळी विमान उड्डाणं सुरक्षित व्हावीत यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना चांगली आणि वक्तशीर सेवा देता येईल, असं कंपनीला वाटतंय. (Air India Plane Crash)

(हेही वाचा – Sambhal Violence : सपा खासदार जियाउर्रहमान बर्क यांच्यासह २३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल)

तसंच बोईंग ७७७ विमानांसाठी अतिरिक्त सुरक्षा पडताळणी करण्याचा निर्णयही टाटा समुहातील या कंपनीने घेतला आहे. मागच्या सहा दिवसांत एअर इंडियाची एकूण ८३ आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द झाली आहेत. विमानांच्या तपासणीबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अडचणींमुळे कंपनीवर ही वेळ ओढवली आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारेपर्यंत कंपनीने मोठ्या विमानांचा वापरच १५ टक्क्यांनी कमी करण्याचं ठरवलंय. (Air India Plane Crash)

एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या तीन मोठी विमानं आहेत बोईंग ७७७, बोईंग ७८७ आणि ए३५०. मोठ्या आकारामुळे यात इंधन खूप प्रमाणात मावतं. त्यामुळे अगदी मुंबई ते न्यूयॉर्क अशी थेट उड्डाणं करण्यासाठी ही विमानं प्रसिद्ध आहेत. पण, आता ही उड्डाणं कमी होणार आहेत. जुलैच्या मध्यापर्यंत एअर इंडिया विमानांचं नवीन वेळापत्रकच सुरू राहील, असं कंपनीने सध्या म्हटलं आहे. ज्या लोकांनी आधीपासून या विमानांसाठी बुकिंग केलं आहे, त्यांना आता प्रवास रिशेड्युल करण्याचा किंवा संपूर्ण परताव्याचा प्रस्ताव कंपनीकडून दिला जाणार आहे. (Air India Plane Crash)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.