अपघातानंतर डीजीसीएचे निर्देश; एअर इंडियाच्या Boeing Aircraft ची सखोल तपासणी सुरु

39

अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर बोईंग विमानांविषयी चर्चा सुरु झाली आहे. (Ahmedabad Plane Crash) एअर इंडियाच्या ताफ्यातील सर्व बोईंग ७८७ (Boeing Aircraft) विमानांची सखोल तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिले होते. त्यानुसार आता एअर इंडियाने (Air India) ही प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीच्या ताफ्यात एकूण ३३ बोइंग ७८७ विमाने आहेत. त्यांपैकी २२ विमानांची चाचणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ११ विमानांची चाचणीही लवकरच पूर्ण होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा – G-7 Summit : कॅनडासोबतचे द्विपक्षीय संबंध सुधारण्याची मोठी संधी; जी-७ मधील राष्ट्रप्रमुखांना पंतप्रधान मोदी भेटणार)

या विमानांचे इंजिन, उड्डाणाची क्षमता आदी महत्त्वपूर्ण तांत्रिक बाबींची चाचणी करण्याचे निर्देश डीजीसीएने दिले होते. बोइंग ७८७ प्रकाराचे पहिले विमान कंपनीच्या ताफ्यात २०१२ मध्ये आले होते, तर अपघातग्रस्त विमान २०१४ मध्ये कंपनीच्या ताफ्यात दाखल झाले होते.

१५ जून २०२५ च्या मध्यरात्रीपासून या सूचना लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक असणार आहे. यामध्ये इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अ‍ॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑइल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची सेवा तपासणी यांचा समावेश आहे. यासोबतच, टेकऑफपूर्वी पॅरामीटर्सचे योग्यरित्या पुनरावलोकन करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत,

DGCA चे निर्देश कोणते?

१. १५ जून २०२५ पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी प्रत्येक विमानाची तपासणी बंधनकारक
२. इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग आणि संबंधित प्रणालींची तपासणी
३. केबिन एअर कंप्रेसर आणि संबंधित यंत्रणांची तपासणी
४. इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टिम चाचणी
५. इंधन चालित अॅक्युएटर व फ्युएल सिस्टिम तपासणी
६. हायड्रॉलिक प्रणालीची सेवा स्थिती तपासणी
७. टेकऑफ पॅरामीटर्सचा आढावा घेणे
८. ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ ही प्रणाली तात्पुरत्या कालावधीत दरम्यानच्या तपासणीत समाविष्ट केली जाणार आहे.
९. पॉवर अ‍ॅश्युरन्स चेक पुढील दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक.
१०. मागील बोईंग ड्रीमलायनर विमानात वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांचा आढावा घेणे. (Boeing Aircraft)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.