Islam : खासगी शिकवणीत हिंदू मुलींच्या धर्मांतराचा प्रयत्न; शिक्षिकेसह 5 जणांना अटक

123

राहुरीच्या उंबरे गावात ट्यूशनच्या नावाखाली धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार उघडकीस येताच राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. यात आणखी दोन शालेय मुलींच्या तक्रारीनुसार या घटनेतील आरोपींची संख्या 8 असून पैकी 5 जणांना राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर गावात दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. फूस लावणाऱ्या आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. या घटनेनंतर गेल्या 4 दिवसांपासून गावात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

राहुरी तालुक्यातील उंबरे गावात मुस्लिम समाजातील हिना शेख हिने 3 वर्षांपासून गावात खासगी क्लास सुरू केले होते. या क्लाससाठी येणाऱ्या सातवी-आठवी वर्गातील अल्पवयीन मुलींचे धर्मांतर करण्याचा तसेच मुस्लिम तरुणांशी ओळख वाढवण्याचा सल्ला शिक्षिका हिना शेख देत होती. 26 जुलै रोजी पहिल्यांदा हा प्रकार समोर आला. त्यानंतर गावात दोन गटांत हाणामारी होऊन दंगलसदृश्य परिस्थिती झाली होती. पोलिसांनी गांभीर्य ओळखून ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. यामुळे तणावाचे वातावरण निवळण्यास मदत झाली. त्यानंतर पहिल्या पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून या घटनेतील आरोपी आवेज निसार शेख व कैफ जिलानी शेख यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कैफ शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून आवेज शेख हा नगर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या घटनेतील उंबरेतील शिक्षिका हिना मुश्ताक शेख हिला शुक्रवारी रात्री, तर सलीम शेख या आरोपीस शनिवारी दुपारी राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेचा तपास अप्पर पोलिस अधिक्षका स्वाती भोर, श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र लोखंडे, उपनिरीक्षक निरज बोकील करीत आहेत.

(हेही वाचा Dengue : मुंबईत डेंग्यूचा बळी; महापालिकेची पडताळणी सुरु)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.