अहमदाबादमध्ये एक प्रवासी विमान कोसळून भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त विमान हे बोईंग (Boeing) कंपनीचे विमान होते. बोईंग विमानाचे जगभरात आजवर सुमारे ६,००० अपघात झाले आहेत. त्यामध्ये ९,००० हून अधिक लोक मरण पावले. जगभरात उडणाऱ्या हजारो प्रवासी विमानांपैकी किमान ४००० हून अधिक विमाने बोईंग कंपनीची ७३७-८०० जातीची आहेत. न्यू यॉर्क टाइम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की, आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिका हे काही प्रमुख खंड आहेत जिथे बोईंग विमाने वापरली जातात. बोईंग (Boeing) विमाने कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही बोईंग विमाने अनेक वेळा कोसळली आहेत. याआधीही २०२४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये बोईंग विमान कोसळले होते, ज्यामध्ये सुमारे १८० जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे, ज्याचे लाईव्ह फोटो भयानक आहेत. या विमानात २४२ लोक होते, ज्यात १२ क्रू मेंबर्स (दोन पायलटसह) आणि २३० प्रवासी होते. या घटनेनंतर काही वेळातच एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली. एअर इंडियाने सांगितले की, अहमदाबाद-लंडन गॅटविक उड्डाण करणारे विमान AI171 गुरुवार, १२ जून २०२५ या दिवशी अपघातग्रस्त झाले. एअर इंडिया विमान अपघातात बोईंगचे (Boeing) ७८७ ड्रीमलाइनर जातीचे विमान होते. अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त विमान बोईंगचे ७३७-८०० विमान होते, जे ७३७ मॅक्स जातीच्या विमानाची नवीन आवृत्ती आहे.
(हेही वाचा Air India Plane Crashed : अहमदाबादमध्ये कोसळले प्रवासी विमान; परिसरात धुराचे लोट)
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका घटनेत ७३७ मॅक्स जातीच्या विमानाच्या दरवाजाचा प्लग उड्डाणादरम्यान उडून गेला. याशिवाय, २०१८ आणि २०१९ मध्येही बोईंग (Boeing) ७३७ मॅक्स विमाने देखील कोसळली, ज्यात लायन एअर फ्लाइट ६१० आणि इथिओपियन एअरलाइन्स फ्लाइट ३०२ यांचा समावेश होता, ज्यामुळे कंपनीला बोईंग (Boeing) विमाने उडवणे थांबवावे लागले होते. ज्यामुळे कंपनीला ३० अब्ज डॉलर्सपर्यंतचे नुकसान झाले. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांतील अपघातात अनुक्रमे १८९ आणि १५७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तथापि, अजूनही बोईंग ७३७-८०० जातीचे विमान वापरात आहे.
बोईंग विमानांमध्ये काय चूक आहे?
जेव्हा बोईंग (Boeing) विमाने सतत क्रॅश होत होती, तेव्हा बोईंग ७३७ मॅक्सची चौकशी करण्यात आली. तपासात मॅन्युव्हरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑगमेंटेशन सिस्टम (MCAS) शी संबंधित समस्या उघडकीस आली. या प्रणालीमुळे मॅन्युअल लँडिंगवरील अवलंबित्व कमी झाले होते, परंतु वैमानिकांना त्याबद्दल फारशी माहिती देण्यात आली नव्हती. परिस्थिती अशी होती की, २०१८ आणि २०१९ मध्ये ३४६ प्रवासी आणि क्रू मेंबर्सना आपला जीव गमवावा लागला. या अपघातानंतर, या विमानाचे ऑपरेशन थांबवण्यात आले. नंतर ते अपडेट करून बोईंग ७३७-८०० या नावाने कार्यान्वित करण्यात आले. त्याच वेळी, अहमदाबादमधील विमान अपघातात बोईंगचे (Boeing) ७८७ ड्रीमलाइनरचा समावेश आहे. यापूर्वी कधीही त्याच्या अपघाताची माहिती नव्हती.
Join Our WhatsApp Community