Plane Accident : एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सौदी एअर लाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला  

सौदी एअरलाइन्सच्या एसव्ही-३११२ विमानाने १४ जूनच्या रात्री पावणे अकरा वाजता जेद्दाह विमानतळावरुन उड्डाण केले. या विमानात २५० हज प्रवासी होते. १५ जूनला सकाळी साडे सहा वाजता विमान लखनऊमधील चौधरी चरण सिंह विमानतळावर उतरले.

71

एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या भीषण अपघाताची (Plane Accident) घटना ताजी असताना आता सौदी एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात टळला आहे. सौदी एअरलाईन्सच्या विमानाच्या लँडिंग गियरमध्ये तांत्रिक अडचण आली. त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानाच्या चाकातून धूर निघू लागला, ठिणग्या उडू लागल्या. याची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. याशिवाय सगळ्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

सौदी एअरलाइन्सच्या एसव्ही-३११२ विमानाने १४ जूनच्या रात्री पावणे अकरा वाजता जेद्दाह विमानतळावरुन उड्डाण केले. या विमानात २५० हज प्रवासी होते. १५ जूनला सकाळी साडे सहा वाजता विमान लखनऊमधील चौधरी चरण सिंह विमानतळावर उतरले. त्यानंतर विमानाच्या डाव्या चाकातून धूर निघू लागला, ठिणग्या उडू लागल्या. यानंतर पायलटने विमान थांबवले आणि घटनेची माहिती हवाई नियंत्रण कक्षाला दिली. यानंतर विमानाला टॅक्सी वेवर नेण्यात आले. तिथून सगळ्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. (Plane Accident)

(हेही वाचा नवीन पनवेलच्या नागरिकांना सतावतेय Kundamala Bridge Collapse सारखी दुर्घटना घडण्याची भीती)

विमानतळावरील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी २० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. विमानाच्या हायड्रॉलिक यंत्रणेला अचानक गळती लागल्याने ही घटना घडल्याची माहिती देण्यात आली. या परिस्थितीतही पायलटने विमान सुरक्षितरित्या उतरवले. या घटनेनंतर विमानतळावर खळबळ उडाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उड्डाणावेळी घडली असती, तर मोठा अनर्थ झाला असता. पायलटने समयसूचकता दाखवत मोठा अपघात टाळला. (Plane Accident) जेद्दाहवरुन २५० हज प्रवाशांना घेऊन येणारे विमान सौदी अरेबियाला रिकामीच परतणार होते.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची (Plane Accident) घटना गेल्याच आठवड्यात घडली. १२ जूनला दुपारी दीडच्या सुमारास एअर इंडियाच्या ताफ्यातील ड्रीमलायनर ७८७ विमानाला उड्डाणानंतर अवघ्या मिनिटभरात अपघात झाला. लंडनला जाणारे विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर एका सरकारी रुग्णालयाच्या हॉस्टेलवर कोसळले. त्यावेळी हॉस्टेलमधील विद्यार्थी मेसमध्ये जेवत होते. या अपघातात एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. यातील २४१ जण विमानातील होते. विमानात २३० प्रवासी आणि १२ कर्मचारी होते. यातील केवळ १ प्रवासी बचावला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.