पुण्यात अ‍ॅडिनो व्हायरसचा संसर्ग

135

पुण्यात मुलांना अ‍ॅडिनो व्हायरसचा संसर्ग झाला असून ५ ते १५ वयोगटातील मुलांना संसर्गाची बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. तथापि, मुंबईत या संसर्गाचे रुग्ण आढळून येत नसल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांनी दिली.

ताप येणे, टॉन्सिल्स आणि घसा खवखवणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात जनरल फिजिशियन आणि बालरोगतज्ज्ञांकडे या लक्षणाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. हा विषाणूजन्य आजार आहे. मुलांची विशेष काळजी घ्या, असे आवाहन पुण्यातील बालरोगतज्ज्ञ करत आहेत. अॅडिनो व्हायरच्या संसर्गामुळे मुलांच्या श्वसन नलिका, आतडे, डोळे तसेच मूत्रमार्ग बाधित होत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले आहे. यांसह सर्दी, न्यूमोनिया आणि पचनाचे आजार तसेच लघवी मार्गाचाही त्रास होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केले. मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर त्यांची विशेष काळजी घ्या, असेही डॉक्टरांनी व्यक्त केले.

(हेही वाचा …तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल; काय म्हणाले जयंत पाटील?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.