-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
पवई तलावाच्या (Powai Lake) पर्यावरणीय व जैव विविधता संवर्धनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही वेगाने करण्यात येत आहे. मात्र, तलावात मलजल मिसळत असल्याने जलपर्णी अधिक वेगाने फोफावत आहे. त्यासाठी पवई तलावात सांडपाणी येण्यापासून रोखण्यासाठी त्या वाहिन्या अन्यत्र वळविणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे या दोन कामांच्या स्वतंत्र निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पवई तलावाच्या नैसर्गिक समृद्धी वाढीसाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. त्यामुळे या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश पुढील आठवड्यात द्यावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. जलपर्णी काढण्यासाठी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असेदेखील निर्देश बांगर यांनी दिले. (Powai Lake)
मागील काही दिवसांपाूसन पवई तलावात (Powai Lake) जलपर्णी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जलपर्णीने तलावाचा पृष्ठभाग व्यापला आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी २० मे २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी विविध निर्देश दिले. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, मुख्य अभियंता (मलनिस्सारण प्रकल्प) विनोद केकाण यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी संस्थेचे (BNHS) प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. (Powai Lake)
(हेही वाचा – Kalyan Building Slab Collapse : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली; मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर)
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, पवई तलावातील सांडपाण्याचा निचरा करण्याकरिता महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) खात्यामार्फत २ निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मलनिस्सारण वाहिनी टाकणे आणि ८ दशलक्ष लीटर क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणे या दोन कामांचा समावेश आहे. पवई तलावात (Powai Lake) १८ दशलक्ष लीटर सांडपाण्याचा प्रवाह येतो. त्यापैकी ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे सध्या बंद असलेल्या पवई उदंचन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित आहे. ८ दशलक्ष लीटर सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रात आणून त्यावर प्रक्रिया करुन ते पुन्हा तलावात टाकण्यात येईल. तसेच, उर्वरित ८ दशलक्ष सांडपाणी हे आदि शंकराचार्य मार्गावरील अस्तित्वात असलेल्या मलनिस्सारण वाहिनीद्वारे भांडुप येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. उर्वरित २ दशलक्ष सांडपाणी हे पेरु बाग येथील उदंचन केंद्राकडे वळवून मलनिस्सारण वाहिनीद्वारे मिठी नदीवरील ९ दशलक्ष लीटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात वळते करण्यात येणार आहे. यामुळे, पवई तलावात येणाऱ्या सांडपाण्याच्या प्रवेशाला अटकाव करुन वळवणे याकरिता मदत होणार आहे. या कामाची निविदा कार्यवाही अधिक वेगाने करत कार्यारंभ आदेश पुढील आठवड्यात द्यावा, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले. कार्यारंभ आदेश दिल्यानंतर संपूर्ण काम पूर्ण होण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. (Powai Lake)
पवई तलावातील (Powai Lake) जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्याची कार्यवाही सुरु आहे. गत सहा महिन्यांत सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तथापि, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढविणे आवश्यक असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले. (Powai Lake)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community