-
प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे सुरू होत असून, या संमेलनासाठी राज्य सरकारने (State Govt) २ कोटी रूपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणून राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून हा निधी देण्यास राज्य सरकारने (State Govt) मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासकीय आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे.
(हेही वाचा – दादरमध्ये १० कोटींच्या एमडी Drugs सह दोघांना अटक)
मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी निधीचा वापर
राज्य सरकारकडून (State Govt) मंजूर केलेला हा निधी फक्त मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार, विकास आणि संवर्धनासाठीच वापरला जाणार आहे. संमेलन संपल्यानंतर ३ महिन्यांच्या आत अखिल भारतीय साहित्य महामंडळाने राज्य मराठी विकास संस्थेकडे या निधीच्या वापराबाबतचे विनियोजन प्रमाणपत्र, संमेलन अहवाल आणि सनदी लेखापालांकडून तपासलेले विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
या निधीच्या मंजुरीमुळे दिल्लीतील साहित्य संमेलन अधिक व्यापक आणि प्रभावी होणार असल्याचे साहित्यप्रेमींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (State Govt)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community