Adani Group : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने चिनी कंपनी ड्रॅगनपाससोबत केलेला करार रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. एका आठवड्यापूर्वीच या दोन कंपन्यांमध्ये करार झाला होता, अशी माहिती देण्यात आली आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या प्रवक्तांनी प्रसिद्धीपत्रक काढून याबाबतची माहिती दिली. (Adani Group)
कंपनीने एका निवेदनात स्पष्ट केले
“ड्रॅगनपाससोबतची आमची भागीदारी तात्काळ संपुष्टात आली आहे. त्यांचे ग्राहक आता अदानी विमानतळांवर लाउंज अॅक्सेससाठी (Adani Airport Lounge Access) पात्र राहणार नाहीत.” तसेक कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की या बदलाचा इतर लाउंज सेवा किंवा बँका आणि क्रेडिट कार्डद्वारे प्रदान केलेल्या सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही. इतर भागीदारांमार्फत लाउंज सेवा जशा आहेत तशाच राहतील. तसेच अदानी ग्रुपच्या ‘अदानी डिजिटल लॅब्स’ने एका आठवड्यापूर्वीच ड्रॅगनपाससोबत भागीदारीची घोषणा केली होती. ड्रॅगनपास ही एक प्रीमियम विमानतळ सेवा प्रदाता आहे. या भागीदारीमुळे प्रवाशांना विमानतळावर आरामदायी लाउंज अनुभव मिळेल असे म्हटले जात होते. पण आता हा करार रद्द करण्यात आला आहे. तसेच ड्रॅगनपाससोबतची भागीदारी रद्द केल्यामुळे, ड्रॅगनपास सदस्यांना यापुढे अदानी समूहाद्वारे व्यवस्थापन केलेल्या मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या विमानतळांवर लाउंज प्रवेश मिळू शकणार नाही.
तुर्कीच्या कंपनीवरही कारवाई करण्यात आली
दरम्यान, भारत सरकारने गुरुवारी तुर्की विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी सेलेबीची (Celebi Security clearance revoked) सुरक्षा मंजुरी रद्द केली. हा निर्णय नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) ने घेतला आहे. दिल्ली विमानतळावर, सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रा. लिमिटेड जमिनीच्या देखभालीची जबाबदारी पाहत होते आणि सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया प्रा. लि. लिमिटेड फ्रेट टर्मिनलचे कामकाज पाहत होते.
(हेही वाचा – Caste Validity Certificate सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ)
दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (डायल) ने एका निवेदनात म्हटले आहे की, बीसीएएसच्या निर्देशांचे पालन करून, त्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (आयजीआयए) येथील जमिनीवरील देखभाल आणि कार्गो ऑपरेशन्ससाठी जबाबदार असलेल्या सेलेबी कंपन्यांसोबतचा करार औपचारिकपणे रद्द केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community