
प्रसिध्द उद्योगपती व अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या पत्नी तथा अदानी फाऊंडेशन(Adani Foundation)च्या अध्यक्षा प्रीती अदानी यांना दुसऱ्यांदा डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. दि. ०६ मे रोजी दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था(डीम्ड युनिव्हर्सिटी), वर्धा यांनी डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२२ मध्ये फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या लेडीज ऑर्गनायझेशनचा सामाजिक प्रभावासाठी प्रीती अदानी यांना उत्कृष्टता पुरस्कार देखील देण्यात आला होता.
(हेही वाचा Indian Economy : २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी )
“डॉक्टरेट पदवी मिळाल्याचा मला अभिमान आहे. ‘सेवा ही साधना आहे, सेवा ही प्रार्थना आहे आणि सेवा हीच देव आहे’ या माझ्या विश्वासाला यामुळे बळकटी मिळते, अशा भावना सन्मान स्वीकारताना प्रीती अदानी यांनी व्यक्त केल्या. त्या पुढे म्हणाल्या, समाजात कायमस्वरूपी बदल घडवून आणणाऱ्या, गरजूंना सक्षम करणाऱ्या, शिक्षण आणि आरोग्य सुविधा वाढवणाऱ्या आणि समुदायांना पुढे आणणाऱ्या उपाययोजना आणि प्रणाली विकसित करण्यासाठी मी समर्पित आहे.
प्रीती अदानी म्हणाल्या, आम्ही तुम्हाला सांगतो की आमचं फाउंडेशन(Adani Foundation) अदानी समुहाची सामाजिक कल्याण आणि विकास शाखा आहे. अदानी ग्रुप हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय समूह आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. संस्थेच्या १६ व्या दीक्षांत समारंभात डीएमआयएचईआरचे माननीय कुलपती दत्ता मेघे यांनी प्रीती अदानींना हा सन्मान प्रदान केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अदानी उपस्थित होते.(Adani Foundation)
Join Our WhatsApp Community