Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन! वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन! वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

115
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन! वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन! वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek lagoo) यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं आहे. अंधेरीतील ओशिवरा इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. विवेक लागू (Vivek lagoo) हे ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते, तर अभिनेत्री लेखिका मृण्मयी लागू ही त्यांची मुलगी आहे. अनेक प्रसिद्ध मालिका आणि चित्रपटांमध्ये विवेक लागू यांनी काम केलं आहे. (Vivek lagoo)

हेही वाचा-नवी मुंबईकरांसाठी सुविधा जलदगतीने मंजूर करा; CM Devendra Fadnavis यांचे आदेश

‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ’31 दिवस’ या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘चार दिवस सासूचे’ , ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय. विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. चल आटप लवकर, प्रकरण दुसरं, सर्वस्वी तुझीच या गाजलेल्या नाटकांचं लेखन विवेक लागू यांनी केलं. (Vivek lagoo)

हेही वाचा- चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार

विवेक लागू हे मराठी चित्रपट आणि टीव्ही जगतात एक प्रसिद्ध नाव होतं. विवेकच्या मृत्यूची बातमी सर्वप्रथम विकी लालवाणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली. (Vivek lagoo)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.