कर्नाटकातील बिदर येथे परीक्षा देण्यासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याच्या अंगावरून जानवे (Janeu) काढून टाकल्याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर बिरादार आणि कर्मचारी सतीश पवार यांना निलंबित करण्यात आले आहे. कर्नाटकात बिदर आणि शिवमोगा येथे परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांचे जानवे पवित्र धागे काढण्याचे प्रकरण समोर आले होते.
कर्नाटकमध्ये, बिदर आणि शिवमोगा येथे, १६ एप्रिल २०२५ रोजी, परीक्षा केंद्रावरील स्क्रीनिंग कमिटीने एका ब्राह्मण मुलाला त्याचे जानवे (Janeu) काढण्यास सांगितले आणि जेव्हा विद्यार्थ्याने नकार दिला तेव्हा त्याला परत पाठवण्यात आले. मुलाने सांगितले की त्याच्या गणिताच्या परीक्षेच्या दिवशी त्याच्यासोबत हे घडले.
(हेही वाचा कुराणचा अवमान केल्या प्रकरणात Wasim Rizvi यांची निर्दोष सुटका; काय होते प्रकरण?)
विद्यार्थ्याने सांगितले की, ज्या दिवशी त्याच्या अंगावरून जानवे (Janeu) काढायला गेला त्या दिवसापूर्वी त्याने कोणत्याही अडचणीशिवाय दोन परीक्षा दिल्या होत्या. कर्नाटक ब्राह्मण महासभेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. हे प्रकरण वाढल्यानंतर कर्नाटकचे शिक्षणमंत्री डॉ. एमसी सुधाकर यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. त्यांनी सांगितले होते की या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल.
Join Our WhatsApp Community