• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
29 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Sunday, May 11, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण World Mental Health Day : दर ८ पैकी एक व्यक्ती ही मानसिक...
  • समाजकारण

World Mental Health Day : दर ८ पैकी एक व्यक्ती ही मानसिक आजाराने त्रस्त

जगभरात मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

October 9, 2023
219
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    World Mental Health Day : दर ८ पैकी एक व्यक्ती ही मानसिक आजाराने त्रस्त
    World Mental Health Day : दर ८ पैकी एक व्यक्ती ही मानसिक आजाराने त्रस्त

    जगभरात मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार इतर आजारांच्या तुलनेत मानसिक आजाराचे प्रमाण १४ टक्के आहे. दर ८ पैकी एक व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आजारांवरील उपचारांना देखील प्राधान्य दिले जात आहे. मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमध्ये एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत मानसिक आरोग्य उपचारांचा २ हजार ४७१ जणांनी लाभ घेतला आहे. महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आरोग्याशी संबंधित रूग्णांची तपासणी, समुपदेशन व पाठपुरावाही करण्यात येत आहे. (World Mental Health Day)

    महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे ७ एप्रिल २०२३ पासून १९० दवाखाने व १३५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये मिळून ४६२ वैद्यकीय अधिकारी यांना मानसिक आरोग्यासंबंधी प्रशिक्षण देण्यात आले आहे. एप्रिलपासून आतापर्यंत नवीन २ हजार ४७१ संशयित मानसिक रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी ३४७ सौम्य आणि ४१ गंभीर स्वरूपाचे रुग्ण आढळले. एकूण २११ रुग्णांना पुढील उपचाराकरीता महानगरपालिका रुग्णालयांमध्ये संदर्भित केले गेले. तर १ हजार ४०० रुग्णांचे समुपदेशन व पाठपुरावा करण्यात आला. (World Mental Health Day)

    मानसिक आजाराची लक्षणे

    उदास वाटणे, परीक्षेची चिंता, कामाच्या ठिकाणी तणाव, तणावात असताना दारू किंवा अमली पदार्थांचे सेवन, वृद्धापकाळातील एकटेपणा, सतत आत्महत्येचा विचार येणे, ही मानसिक आरोग्य स्थिर नसल्याची लक्षणे आहेत. मानसिक आजारामुळे माणसांचे विचार, वर्तन आणि भावनिक नियंत्रण यामध्ये अडथळे येतात. विचारांचा आणि भावनांचा योग्य मेळ न बसल्याने मानसिक संतुलन बिगडते. तसेच योग्य वेळेत उपचार झाल्यास मानसिक आजारांवर नियंत्रण येते. (World Mental Health Day)

    अशाप्रकारे करता येऊ शकतो उपचार

    समाजात मानसिक रुग्ण हा लोकांच्या हेटाळणीचा विषय असल्याने हे रुग्ण मानसिक आजाराबदल सल्ला व उपचार घेण्यास दिरंगाई करतात. कोणत्याही रुग्णामध्ये अशी लक्षणे दिसू लागताच त्यांनी स्वतः हून अथवा त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णावर वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावेत. मानसिक आजारांवर उपचार करताना ध्यान (मेडिटेशन), योगासने व व्यायाम, व्यसनांपासून दूर राहणे, प्रसन्न व आनंदी मन, उत्तम नातेसंबंध व सुसंवाद, लक्षणे आढळताच त्वरित उपचारांना प्रारंभ या बाबी महत्त्वाच्या ठरतात. महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालय अंतर्गत मानसोपचार विभागामार्फत २४ तास हितगुज हेल्पलाईन (जगण्याची नवी उमेद) ही सेवा २४१३-१२१२ या क्रमांकावर कार्यरत आहे. या सुविधेचा लाभ घ्यावा, तसेच महानगरपालिकेच्या दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. (World Mental Health Day)

    (हेही वाचा – BMC Tree Plantation : मुंबईत पुन्हा बहरणार दुर्मिळ झाडे)

    मानसिक आजारांचे १४ टक्के रुग्ण

    निरोगी शरीरासोबत उत्तम मानसिक आरोग्याची गरज असते. जगभरात मानसिक आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार इतर आजारांच्या तुलनेत मानसिक आजाराचे प्रमाण १४ टक्के आहे. जगात दर ८ पैकी एक व्यक्ती मानसिक आजाराने त्रस्त आहे. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेच्या वतीने मानसिक आजारांवरील उपचारांना देखील प्राधान्य दिले जात आहे. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालय व वैदकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्यसंबंधी रुग्ण सेवा देण्यात येत आहे. तसेच भरडावाडी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये दरमहा अंदाजे ४०० व राजावाडी रुग्णालयात दरमहा अंदाजे ८०० रुग्णांना व्यसन मुक्ती उपचार करण्यात येत आहेत, असे सार्वजनिक आरोग्य खात्याच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी, डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले. (World Mental Health Day)

    त्या पुढे म्हणाल्या की, १० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी विविध प्रकारे प्रसिद्धी व प्रचार करण्यात येत आहे. मानसिक आजाराची लक्षणे व मानसिक आजारांवर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा याबाबतची माहिती पोस्टर्सच्या माध्यमातून तसेच समाज माध्यमातून देण्यात येत आहे. तसेच रेडिओ जिंगलच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात माहिती प्रसारित करण्यात येत आहे, असे त्या म्हणाल्या. (World Mental Health Day)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • mental health
    • mental illness
    • Mumbai
    • Mumbai Municipal Corporation
    • Public Health Account
    • WHO
    • World Mental Health Day
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleBMC Tree Plantation : मुंबईत पुन्हा बहरणार दुर्मिळ झाडे
      Next articleWorld Cup 2023 : न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Ceasefire : शस्त्रसंधीला तिलांजली देणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर May 10, 2025
      • Operation Sindoor : ८६ तासांच्या ‘युद्धात’ कोणकोणत्या घडल्या घडामोडी? भारताने काय मिळवले? जाणून घ्या… May 10, 2025
      • Pakistan कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात BSF जवान मोहम्मद इम्तियाज हुतात्मा, ७ जण जखमी May 10, 2025
      • Ceasefire : पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा सुरू, मागील दोन दिवसांपेक्षा अधिक ड्रोन हल्ले केल्याची माहिती May 10, 2025
      • बोरिवलीतील मंगल कार्यालय अनधिकृत; BMC ने चालवला थेट बुलडोझर May 10, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Ceasefire : शस्त्रसंधीला तिलांजली देणाऱ्या पाकिस्तानला भारताकडून जोरदार प्रत्युत्तर May 10, 2025
      • Operation Sindoor : ८६ तासांच्या ‘युद्धात’ कोणकोणत्या घडल्या घडामोडी? भारताने काय मिळवले? जाणून घ्या… May 10, 2025
      • Pakistan कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात BSF जवान मोहम्मद इम्तियाज हुतात्मा, ७ जण जखमी May 10, 2025
      • Ceasefire : पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा एकदा सुरू, मागील दोन दिवसांपेक्षा अधिक ड्रोन हल्ले केल्याची माहिती May 10, 2025
      • बोरिवलीतील मंगल कार्यालय अनधिकृत; BMC ने चालवला थेट बुलडोझर May 10, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline