Minister Tanaji Sawant : आरोग्य मंत्री सावंतांच्या ताफ्याला अपघात; रुग्णवाहिकाच उपलब्ध नव्हती

134

आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांच्या ताफ्याला कोल्हापुरात अपघात झाला. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मंत्री तानाजी सावंत यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई दर्शन करून झाल्यानंतर तानाजी सावंत जोतिबाला दर्शनासाठी जात होते. यावेळी मंत्री तानाजी सावंत ज्या गाडीमध्ये बसले होते, त्या पाठीमागच्या गाडीने धडक दिल्याने अपघात झाला.

मंत्री तानाजी सावंत (Minister Tanaji Sawant) यांच्या स्वीय सहाय्यकाला किरकोळ दुखापत झाली. आरोग्य मंत्र्यांच्याच ताफ्यात जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचे समोर आले. सावंत यांच्या ताफ्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही रुग्णवाहिका सहभागी नव्हती. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुरु असलेल्या तयारीची माहिती दिली. नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने तयारी झाली आहे. मात्र, हा व्हेरियंट सौम्य आहे. केरळमध्ये जे तीन मृत झाले त्यात जेएन 1 नव्हता. 23 डिसेंबर रोजी टास्क फोर्सची याबाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील, असे मंत्री सावंत म्हणाले.

(हेही वाचा Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी ३५ तासांनंतर सुटली, पोलिसांच्या प्रयत्नांना यश)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.