Accident : दुचाकी आणि स्कॉर्पिओच्या धडकेत पोलीस उपनिरीक्षिक जागीच ठार

ड्युटी संपवून घरी परतत असताना ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे.

187
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
Truck-Eicher Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-आयशरचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

परभणी (Parbhani) येथे पोलीस उपनिरीक्षिकाच्या दुचाकीचा आणि स्कॉर्पिओचा मोठा अपघात झाल्याची घटना रविवारी (१४ जानेवारी) रात्री हीे घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की जागीच यांचा मृत्यू झाला. तर ड्युटी संपवून घरी परतत असताना ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. (Accident)
सोनपेठ यथील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे असे या निरीक्षकाचे नाव आहे. ड्युटी संपवून घरी परतत असताना सोनपेठ वरून पाथरीकडे जात असताना भारसवाडा गावानजीक समोरून यणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. (Accident)

(हेही वाचा : Manoj Jarange : आंदोलनापूर्वीच बच्चू कडू मनोज जरांगेच्या भेटीला; नक्की काय आहे या मागचे कारण?)

गाडीची धडक इतकी भीषण होती की यात उपनिरीक्षक गवारे यांची दुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली. यातच दोन्ही वाहनांनी पेट घेतेला. व दोन्ही वाहने जळून खाक झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात कसा झाला याचे व्हिडीओ देखील समोर आले आहे. तर याठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे येथील गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.