Malad S. V. Road : मालाड पश्चिममधील आणखी एक वाहनकोंडी फुटली, चिंचोली बंदरमधून प्रवास होणार सुसाट

251
Malad S. V. Road : मालाड पश्चिममधील आणखी एक वाहनकोंडी फुटली, चिंचोली बंदरमधून प्रवास होणार सुसाट
Malad S. V. Road : मालाड पश्चिममधील आणखी एक वाहनकोंडी फुटली, चिंचोली बंदरमधून प्रवास होणार सुसाट

पश्चिम उपनगरांतील मालाडमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणखी एक मैलाचा अडथळा महापालिका पी उत्तर विभागाच्यावतीने दूर केला. एस. व्ही. रोडवरील चिंचोली फाटक दर्गाह मशिदी जवळील रस्ते बाधित ठरणारी २४ बांधकामे आणि उंदेराई जंक्शनवरील १५ बांधकामे अशाप्रकारची एकूण ३९ बांधकामे गुरुवारी हटवण्यात आली आहे. पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे चिंचोलीतील प्रवास आता अडथळ्याविना होणार आहे. (Malad S. V. Road)

मालाडच्या हद्दीत एस. व्ही. रोड मार्गावरील गोरेगाव ते कांदिवलीच्या हद्दीपर्यंत एकूण ३२९ बांधकामे आहेत. त्यातील आजमितीस २५३ बांधकामे हटवण्यात आली आहेत. यात या रोडवरील चिंचोली फाटक दर्गाह मशिदी जवळील रस्ते बाधित ठरणारी २४ बांधकामे आणि उंदेराई जंक्शनवरील १५ बांधकामे अशाप्रकारची एकूण ३९ बांधकामे हटवण्यात गुरुवारी हटवण्यात आली आहे. दर्गाह मशिदला जोडून रस्त्यावर ही बाधित बांधकामे होती. सर्वांना विश्वासात घेऊन तसेच रस्ता रुंदीकरणाचे महत्व समजावून देत महापालिकेच्यावतीने बाधित बांधकामे हटवण्यात आली आहे. (Malad S. V. Road)

New Project 2023 10 05T203517.242

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा)

या मार्गावरील चार बॉटलनेक काढण्यात आले. त्यामुळे या भागात २५ फुट रुंद असलेला रस्ता आता ६५ फुट एवढा करण्यात आला आहे. अतिक्रमण हटवून एसव्ही रोड रुंदीकरणाची ही कार्यवाही परिमंडळ चारचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता मंदार चौधरी यांच्यासह सात अभियंते, दहा कामगार यांच्या मार्फत दोन जेसीबी यंत्राच्या मदतीने ही तोडक कारवाई करून एस. व्ही. रोडच्या रुंदीकरणातील बाधा दूर करण्यात आला आहे. इतर अभियंते व कर्मचारी वर्ग यांच्या मदतदोन जेसीबी सयंत्र, दहा कामगार आणि सात अभियंत्यांमार्फत निष्कासित करण्यात आलीत. त्यामुळे चिंचोलीमधून जाताना आता जास्त वेळ अडकून पडण्याची वेळ येणार नाही. (Malad S. V. Road)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.