Mumbai-Pune Express Way वरील प्रत्येक २ किलोमीटरवर दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार

155

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) अपघात झाल्यावर तात्काळ मदत पोहचवण्यासाठी आधी अपघाताची माहिती लगेच मिळणे आवश्यक असते, परंतु महामार्गावर अशी यंत्रणाच नसल्याने अनेकदा अपघातग्रस्तांना मदत मिळत नाही. त्यामुळे आता महामार्गावर दर २ किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(हेही वाचा Exam Paper Leak : तब्बल १५ राज्यांत सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांचे पेपर फुटले; किती लाख परिक्षार्थींचे भवितव्य आले धोक्यात? जाणून घ्या…)

या दूरध्वनी केंद्राच्या माध्यमातून वाहनचालक थेट महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील. ९५ किलोमीटरच्या हा महामार्गावर  (Mumbai-Pune Express Way) दर दोन किलोमीटरवर एक दूरध्वनी केंद्र उभारण्यात येणार आहे. मुंबई आणि पुणे या शहरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन प्रसंगी सुरक्षा सुविधा सहजपणे आणि तातडीने उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही सोय करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाशी दूरसंचार क्षेत्रातील ‘वी’ कंपनीने एक विशेष करार केला आहे. त्याअंतर्गत पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Express Way) आपत्कालीन  दूरध्वनी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या करारानुसार वी कंपनी सर्व केंद्रांना नेटवर्क देणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.