Pimpri-Chinchwad : महापालिका शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

188
Pimpri-Chinchwad : महापालिका शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) महानगरपालिकेच्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने आठवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सार्थक कांबळे असं मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्याचे नाव आहे, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे. हुतात्मा चापेकर विद्यामंदिर ही महानगरपालिकेची शाळा आहे. (Pimpri-Chinchwad)

ही घटना दुपारी बाराच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक कांबळे हा इतर मित्रांसह तिसऱ्या मजल्यावर थांबला होता. पायऱ्याजवळ असलेल्या लोखंडी ग्रीलवर आतील बाजूस पाय करून सार्थक बसला होता. त्याच्या मित्रांनी त्याला असं बसू नकोस, तू खाली पडशील असं म्हणताच तेवढ्यात सार्थक खाली पडला. (Pimpri-Chinchwad)

(हेही वाचा – Dynasty IN Congress : काँग्रेसवर घराणेशाहीचा घाव ! आतापर्यंत किती नेत्यांनी ‘हात’ सोडला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?)

गंभीर जखमी झालेल्या सार्थकला तातडीने महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police) दिली आहे. या घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Pimpri-Chinchwad)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.