Fire : गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी मध्यरात्री भीषण आग

207
मुंबईतील गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरातील झोपडपट्टीला शनिवारी, १७ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. ही काही वेळातच सर्वत्र पसरली आणि आगीने रौद्ररुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहे.

आग आटोक्यात 

या आगीमुळे स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संसार, उपयोगी वस्तू डोळ्यादेखत जळून खाक झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. गोवंडी-शिवाजी नगर आणि आदर्श नगर हा झोपडपट्टी परिसर असून या भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना अचानक आग (Fire) लागली. आग लागल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. अनेकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडल्याने संपूर्ण झोपडपट्टीला विळखा पडला. त्यामुळे नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.