Chhattisgarh मध्ये नक्षलवाद्यांकडून उपसरपंचाची हत्‍या, परिसरात भीतीचे वातावरण 

79
Chhattisgarh : छत्तीसगडच्या सुकमा जिल्‍ह्यात नक्षल्‍यांनी तारलागुडाचे उपसरपंच मुचाकी रामा यांची हत्‍या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या विषयी मंगळवारी ०६ मे ला माहिती दिली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्‍ह्याच्या जगरगुंडा पोलीस स्‍टेशनच्या (Jagargunda Police Station) हद्दीतील बेनपल्‍ली गावात सोमवारी नक्षल्‍यांनी तारलागुडा गावचे उपसरपंच मुचाकी रामा यांची हत्‍या केली. मुचाकी रामा यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती. (Chhattisgarh)
मिळालेल्या माहितीनुसार, रामा बेनपल्‍ली हे तारलागुडा गावातलेच निवासी होते. तसेच ते तारलागुडा गावाचे उपसरपंच होते. दरम्यान सोमवारी दुपारी जवळपास तीन वाजण्याच्या सुमारास शस्‍त्रधारी नक्षली ग्रामीण वेशभूषेत बेनपल्‍ली गावात आले. यावेळी नक्षल्‍यांनी रामा यांना घरातून बाहेर नेले. त्‍यांची दोरीने गळा दाबून हत्या केली.

(हेही वाचा – Pune Naxal Arrest : औद्योगिक शहरे नक्षलवाद्यांच्या रडारवर ?; नक्षलवादी प्रशांत कांबळेची एटीएसकडून चौकशी सुरु

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीसांना जेंव्हा या घटनेची माहिती मिळाली तेंव्हा त्‍यांनी पोलीस पथक बेनपल्‍ली गावासाठी रवाना केले. यानंतर उपसरपंचांचा मृतदेह पोस्‍टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  तसेच पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी उपसरपंचांची हत्‍या करणाऱ्या नक्षल्‍यांची शोध मोहिम सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही पहा  – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.