DA बरोबर सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवण्याची शक्यता

केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल.

196

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवणार असल्याची आनंदाची बातमी मोदी सरकार लवकरच देण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपयांवरून २६,००० रुपये होईल. दरवर्षी वाढत्या महागाईतून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता देते.

DA सुद्धा वाढण्याची शक्यता

केंद्र सरकार १ जुलैपासून डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होईल. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या अहवालावर विश्वास ठेवला तर सरकार जुलैमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करू शकते. केंद्र सरकारने मार्चमध्ये अखेरचा डीए वाढवला होता. मार्चमध्ये वाढलेला डीए १ जानेवारी २०२३ पासून जोडला जाईल. ४ टक्क्यांच्या वाढीमुळे जर तुमचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर जुलैपासून दर महिन्याला ७२० रुपये अधिक येतील. वार्षिक आधारावर जोडल्यास तुम्हाला ८६४० रुपयांची वाढ मिळेल.

(हेही वाचा Tukaram Munde : अवघ्या महिनाभरात ‘आयएएस’ तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; दीपक केसरकरांच्या विभागाची धुरा सांभाळणार)

सरकार फिटमेंट फॅक्टरदेखील वाढवू शकते

डीए व्यतिरिक्त सरकार यावेळी फिटमेंट फॅक्टर देखील वाढवू शकते. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी फिटमेंट फॅक्टर वापरते. सरकार हे फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून ३.६८ टक्क्यांपर्यंत वाढवू शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.