Central Government : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता ५० टक्क्यांंपर्यंत वाढण्याची शक्यता

. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवते. AICPI डेटानुसार, सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते

923

येत्या एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकार २०२४ च्या सुरवातीला केंद्र सरकार महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवण्याचा मोठा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे नवीन वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकार ४८ लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांना त्यांच्या महागाई भत्त्यात आणि जानेवारी ते जून या महिन्यांसाठी महागाई भत्ता वाढवून देते. केंद्र सरकारला जानेवारी ते जून २०२४ या महिन्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्याची गरज आहे. पण यावेळी हा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.(Central Government )

महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या निमित्ताने महागाई भत्त्यात वाढीची भेट देऊ शकते. केंद्र सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा डीए वाढवते. AICPI डेटानुसार, सरकार सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करते. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डीए कधी तीन टक्के तर कधी चार टक्क्यांनी वाढतो. आता नव्या वर्षात महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होऊन महागाई भत्ता ५०टक्के होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे सध्या महागाई भत्ता ४६ टक्के आहे. (Central Government )

(हेही वाचा : Unseasonal Rain : पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज)

महागाई सवलतीतही वाढ होण्याची शक्यता
सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासोबतच पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीतही वाढ केली जाते. डीए आणि डीआरमधील या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनवर होतो. सध्या सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४६ टक्के DA आणि DR दिला जात आहे. सरकारने महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला तर, महागाई भत्ता आणि सवलत ४६ टक्क्यांवरून ५०टक्के होईल. (Central Government )

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.