Mulund Dumping Ground वरील ६९ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया; आयुक्तांनी स्वत: जाऊन केली पाहणी

1068
Mulund Dumping Ground वरील ६९ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया; आयुक्तांनी स्वत: जाऊन केली पाहणी
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील (Mulund Dumping Ground) कचऱ्याची विल्हेवाट लावून जमिन पुनर्प्राप्त करून देण्याचे काम सुरु असून या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या बायो-मायनिंग प्रकल्पाची पाहणी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी केली. ऑक्टोबर २०१९ पासून हे प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, या रिकाम्या करण्यात येणाऱ्या जागेवर धारावी विकास प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या अपात्र लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी पुनर्वसन इमारतींचे बांधकाम केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा रिकामी करून देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचा – WTC Final : स्टिव्ह स्मिथने ‘या’ बाबतीत गॅरी सोबर्स आणि डॉन ब्रँडमन यांनाही टाकलं मागे)

मुलुंड क्षेपणभूमी (Mulund Dumping Ground) येथील बायो-मायनिंग प्रकल्पास डॉ. गगराणी यांनी यांनी गुरुवारी १२ जून २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलतांना गगराणी यांनी मुंबईतील विविध भागांतून मुलुंड क्षेपणभूमी येथे आणल्या जाणाऱ्या कचऱ्यावर विहित वेळेत योग्य ती प्रक्रिया करुन त्याची तत्काळ विल्हेवाट लावावी, असे निर्देश दिले आहेत.

(हेही वाचा – अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेवर CM Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया; राज्य सरकार सर्वतोपरी मदतीसाठी सज्ज)

मुलुंड क्षेपणभूमीवरील (Mulund Dumping Ground) कचरा निष्कासित करुन मूळ जागा पुनर्प्राप्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील सुमारे ७ दशलक्ष मेट्रिक टन कचऱ्यावर योग्य प्रक्रिया करुन त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मायनिंग प्रकल्प राबविला जात आहे. कचऱ्यातील माती, ज्वलनशील पदार्थ तसेच राडारोडा किंवा दगडासारख्या घटकांचे वर्गीकरण करुन त्यावर याठिकाणी प्रक्रिया केली जाते. ऑक्टोबर २०१९ पासून हे प्रकल्प कार्यरत असून याठिकाणी आतापर्यंत ४.८१ दशलक्ष मेट्रिक टन म्हणजे ६८.७७ टक्के कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. भेटीदरम्यान गगराणी यांनी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या यंत्रसामग्रीची पाहणी केली. तसेच, कचऱ्यावरील प्रक्रियेबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.