Corona Updates : देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू

49
Corona Updates : देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू
Corona Updates : देशभरात कोरोनाचे ६,१३३ रुग्ण, २४ तासांत ६ जणांचा मृत्यू

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली असून, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरात सध्या कोरोना विषाणूचे ६,१३३ सक्रिय रुग्ण आहेत, तर ६,२३७ रुग्णांनी संसर्गावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या रुग्णांची संख्या नियंत्रणात असली, तरी वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने (Central Govt) सर्व राज्यांना सतर्क राहण्यास आवश्यक उपाययोजना त्वरित राबवण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढत असून ६६५ सक्रिय प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, केरळमध्ये ३, कर्नाटकमध्ये २ आणि तामिळनाडूमध्ये १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये केरळमधील तिघांचे वय अनुक्रमे ५१, ६४ आणि ९२ वर्षे होते. कर्नाटकमधील दोन पुरुष रुग्ण ४६ आणि ७८ वर्षांचे, तर तामिळनाडूतील रुग्ण ४२ वर्षांचा होता. विशेष म्हणजे, गेल्या २४ तासांत मृत्युमुखी पडलेले सर्व रुग्ण पुरुष होते. (Corona Updates)

(हेही वाचा – भिकेला लागलेल्या Pakistan चे उफराटे चाळे; IMF कडून निधी मिळताच खासदारांचे पगार ५०० टक्क्यांनी वाढवले)

जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे एकूण ६१ मृत्यू झाले आहेत. एकट्या दिल्लीमध्येच (Delhi) यावर्षी आतापर्यंत ७ जणांनी प्राण गमावले आहेत. रविवारी (दि.८) सकाळपर्यंत देशात ५,७५५ सक्रिय रुग्ण होते आणि ५,४८४ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. (Corona Updates)

कोरोनाचे हे पुन्हा डोके वर काढणे लक्षात घेता, केंद्र सरकारने (Central Govt) सर्व राज्यांना सतर्क राहण्यास आणि कोविड (Covid) व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, यावेळी कोरोना फारसा धोकादायक नसला तरी वयस्कर, आजारी आणि लहान मुलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण करणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि संसर्गाची लक्षणे आढळल्यास त्वरित चाचणी करणे ही मूलभूत खबरदारी महत्त्वाची आहे. (Corona Updates)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.