छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; एका चिमुकल्यासह सहा जण ठार, २० जखमी

178
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; एका चिमुकल्यासह सहा जण ठार, २० जखमी
छत्तीसगडमध्ये भीषण अपघात; एका चिमुकल्यासह सहा जण ठार, २० जखमी

छत्तीसगडमधील रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात एका चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे.

(हेही वाचा – Shevgaon Voilence: छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीत दोन गटात हाणामारी; ३० ते ३५ जण ताब्यात)

मिळालेल्या माहितीनुसार, पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही अपघातीच दुर्घटना घडली. मृतांमध्ये पाच महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. पिकअप वाहनामधील लोक कौटुंबिक कार्यक्रम उरकून परत येत होते. त्याचवेळेस जोरदार वेगात आलेल्या ट्रकने पिकअप वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.