मध्य रेल्वेकडून ५७४ उन्हाळी विशेष ट्रेन

54

मध्य रेल्वेने एप्रिल ते जून २०२२ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, पुणे, नागपूर आणि साईनगर शिर्डी येथून विविध ठिकाणी ५७४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

यात खालील विशेष ट्रेन समाविष्ट आहेत :

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मनमाड/ नागपूर/ मालदा टाउन/ रिवा दरम्यान १२६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत. दादर आणि मडगाव दरम्यान ६ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शालिमार/ बलिया/ गोरखपूर/ समस्तीपूर/ थिवि दरम्यान २८२ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • पनवेल आणि करमळी दरम्यान १८ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • नागपूर आणि मडगाव दरम्यान २० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • पुणे आणि करमळी/ जयपूर/ दानापूर/ वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन/ कानपूर सेंट्रल दरम्यान १०० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • साईनगर शिर्डी आणि ढेहर का बालाजी दरम्यान २० उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.
  • लातूर आणि बिदर दरम्यान २ उन्हाळी विशेष ट्रेन आहेत.

( हेही वाचा: बूस्टर डोसमधील अंतर कमी होणार? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय )

सर्व कोविड नियमांचे पालन करावे

या सर्व उन्हाळी विशेष ट्रेनचे बुकिंग आधीच सुरू झाले आहे. कृपया www.irctc.co.in वर लॉग इन करा किंवा आरक्षणासाठी जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्राला भेट द्या. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी NTES ॲप डाउनलोड करावे. प्रवाशांनी त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याची विनंती केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.