Railway Protection Force: ‘नन्हे फरिश्‍ते’मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाकडून ५४९ हरवलेल्या मुलांची त्‍यांच्या पालकांसोबत पुनर्भेट

ऑपरेशन 'जीवन रक्षा' अंतर्गत जानेवारी 2024 मध्ये आरपीएफच्या सतर्क आणि जलद कारवाईमुळे एका महिन्यात रेल्वे फलाट आणि रेल्वे रुळांवर, चाकाखाली अडकणे, धावत्या गाडीमधून उतरताना किंवा चढताना चुकून पडलेल्या 233 प्रवाशांचे प्राण वाचवण्‍यात आले.

135
Railway Protection Force: ‘नन्हे फरिश्‍ते’मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाकडून ५४९ हरवलेल्या मुलांची त्‍यांच्या पालकांसोबत पुनर्भेट
Railway Protection Force: ‘नन्हे फरिश्‍ते’मोहिमेअंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाकडून ५४९ हरवलेल्या मुलांची त्‍यांच्या पालकांसोबत पुनर्भेट

रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र तसेच प्रवाशांच्या कल्याणाचे रक्षण करण्यासाठी आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाकडून ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते २०२४’ या उपक्रमांतर्गत रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून जानेवारी २०२४मध्ये ५४९ हरवलेल्या मुलांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट करून देण्यात आली. या मोहिमेअंतर्गत आरपीएफने (Railway Protection Force) हरवलेल्या मुलांना त्यांच्या घरी सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले.

ही मुले विविध कारणांसाठी घरातून विभक्त झाली होती. ऑपरेशन ‘जीवन रक्षा’ अंतर्गत जानेवारी 2024 मध्ये आरपीएफच्या सतर्क आणि जलद कारवाईमुळे एका महिन्यात रेल्वे फलाट आणि रेल्वे रुळांवर, चाकाखाली अडकणे, धावत्या गाडीमधून उतरताना किंवा चढताना चुकून पडलेल्या 233 प्रवाशांचे प्राण वाचवण्‍यात आले.

आरपीएफ महिला प्रवाशांच्या सुरक्षेविषयी गांभीर्याने कार्य करीत आहेत. यासाठी “मेरी सहेली” उपक्रम सुरू केला आहे. जानेवारी 2024 मध्ये, 229 “मेरी सहेली” संघांनी 13,615 गाड्यांमध्ये हजेरी लावली आणि 4 लाखांहून अधिक महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली. महिला प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करणाऱ्या 7402 व्यक्तींविरुद्ध आरपीएफने कायदेशीर कारवाई केली तसेच दलालांविरुद्धच्या लढाईत, आरपीएफने जानेवारी 2024 मध्ये 379 व्यक्तींना अटक करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. याव्यतिरिक्त, त्यांनी 44.46 लाख रुपये किंमतीची आगाऊ आरक्षित केलेली रेल्वे तिकिटे जप्त केली.

(हेही वाचा –Anza Football Boots : पूर्णपणे भारतीय बनावटीचे अंझा बूट गेमचेंजर कसे ठरले? )

‘आरपीएफ’पूरक मदत…
रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) 76 लोकांना अटक करून त्यांच्याकडून अंमली पदार्थ जप्त केले. या अंमली पदार्थांची किंमत 4.13 कोटी रुपये इतकी आहे. या गुन्हेगारांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सरकारी यंत्रणांकडे सुपूर्द करण्यात आले तसेच आरपीएफने, रेल्वे मदद पोर्टल आणि हेल्पलाइन क्रमांक 139 -जी आपत्ती प्रतिसाद मदत प्रणाली क्र. 112 वरून प्राप्त झालेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसंबंधित तक्रारींचे त्वरित निराकरण केले. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांविरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नांना आरपीएफ पूरक अशी मदत पोहोचवते. जानेवारी 2024 मध्ये, आरपीएफने प्रवाशांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या 225 गुन्हेगारांना अटक केली. त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित जीआरपी (GRP)पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. प्रवासी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी आणि रेल्वे सेवेचे रक्षण करण्याच्या दृढ प्रयत्नात, आरपीएफने जानेवारी 2024 मध्ये धावत्या गाड्यांवर दगडफेकीसारख्या गंभीर कृत्यात सहभागी असलेल्या 53 लोकांना अटक केली.

अवैध मालवाहतुकीला आळा
मानवतावादी दृष्टिकोन ठेवून, आरपीएफने जानेवारी 2024 मध्ये आपल्या रेल्वे प्रवासादरम्यान 227 वृद्ध, आजारी किंवा जखमी प्रवाशांना मदत केली. अवैध मालवाहतुकीला आळा घालणे (ऑपरेशन सतर्क): जानेवारी 2024 मध्ये “ऑपरेशन सतर्क” अंतर्गत, रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) 30.15 लाख रुपये किमतीची अवैध तंबाखू उत्पादने आणि अवैध दारू जप्त केली आणि यासंदर्भात 86 जणांना अटक केली. या व्यक्तींना नंतर संबंधित सरकारी कायदा अंमलबजावणी यंत्रणेकडे सोपवण्यात आले. याव्यतिरिक्त, रेल्वे सुरक्षा दलाने आपल्या कारवाईदरम्यान 1.53 कोटी रुपये बेहिशेबी रोख रक्कम , 37.18 लाख रुपये किमतीचे सोने आणि 11.67 लाख रुपये किमतीची चांदी जप्त केली.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.