Congress चे मुंबईतील ४० टक्के माजी नगरसेवक इतर पक्षात

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे एकूण ३० नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर विठ्ठल लोकरे यांनी पक्षाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते निवडून आले.

376
Lok Sabha Election 2024 : काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर; जाणून घ्या नितिन गडकरी विरुद्ध कोण ?

मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांच्यापाठोपाठ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला (Congress) राम राम ठोकत अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असला तरी मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला (Congress) मुंबईत घर घरच लागली. मुंबईत सन २०१७च्या निवडणुकीत निवडून आलेल्या माजी नगरसेवकांपैंकी तब्बल ३५ ते ४० टक्के माजी नगरसेवकांनी शिवसेना उबाठा, शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे आणखी काही नगरसेवक हे याच पक्षाच्या वाटेवर असल्याने निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचा सुफडा साफ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Congress)

मुंबई महापालिकेच्या २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे (Congress) एकूण ३० नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर विठ्ठल लोकरे यांनी पक्षाच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आणि पोटनिवडणुकीत ते निवडून आले. त्यानंतर काँग्रेसच्या (Congress) स्टेफी केणी, राजपती यादव हे जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरले, तर शिवसेनेचे दोन नगरसेवक जातप्रमाणपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरल्याने नितीन सलाग्रे आणि मोहम्मद रफिक हे दोन नगरसेवक पुन्हा वाढले. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) एकूण २९ नगरसेवक संख्या होती. त्यातच मनोज जामसुतकर आणि कमलेश राय यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने अनुक्रमे सोनम जामतसुतकर आणि सुषमा राय यांच्याही अप्रत्यक्ष शिवसेनेत प्रवेश झाला होता. मार्च २०२२ महापालिकेची मुदत संपुष्टात येताच दोन्ही माजी नगरसेविकांनी शिवसेनेत प्रवेश केला. (Congress)

(हेही वाचा – Panvel Municipal Corporation: मुंबईनंतर आता पनवेललाही उभारणार संसर्गजन्य आजारांवरील उपचारांसाठी विशेष रुग्णालय, कसे असेल? वाचा सविस्तर…)

आगे आगे देखो होता है क्या

त्यामुळे आधी विठ्ठल लोकरे, व त्यानंतर सोनम जामसूतकर आणि सुषमा राय यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची संख्या ३० वरून २७ आली होती. त्यातच काही दिवसांपूर्वी पुष्पा कोळी, बब्बू खान, सुप्रिया सुनील मोरे, वाजिद कुरेशी, गंगा कुणाल माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मुख्यनेता असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जगदीश अमित कुट्टी आणि राजेंद्र नरवणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या (Congress) एकूण ३० माजी नगरसेवकांपैंकी १० माजी नगरसेवकांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आता ३० पैंकी २० माजी नगरसेवक उरले असून त्यातील काही माजी नगरसेवक हे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या संपर्कात असल्याची बोलले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांच्या प्रवेशादरम्यान आगे आगे देखो होता है क्या अशा शब्दांत पुढील काळातील इतर माजी नगरसेवकांच्या प्रवेशाची कल्पना दिली आहे. (Congress)

मागील पाच वर्षांमध्ये मुंबईतील काँग्रेसचे (Congress) नेतृत्व हे कमजोर बनत चालले असून वर्षा गायकवाड यांनी या पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतरच धारावीतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला तर शीव कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील व गायकवाड यांच्या कट्टर समर्थक मानल्या जाणाऱ्या पुष्पा कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याशिवाय कुर्ला चांदिवली विधानसभेतील वाजिद कुरेशी यांनीही प्रवेश केल्यानंतर आता कुट्टी व नरवणकर अशाप्रकारे एकूण सात माजी नगरसेवकांनी तर गायकवाड यांनी मुंबई काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रवेश केला आहे. त्यामुळे एकप्रकारे हे नेतृत्व त्यांना मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून भविष्यात अजुनही काही इतर पक्षांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. (Congress)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.