पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका

321
पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका
  • प्रतिनिधी

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा झटका बसणार आहे. कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या (Sixth Line) कामासाठी पश्चिम रेल्वेने तब्बल 36 तासांचा पॉवर ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवार दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होणार असून, तो रविवारी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत म्हणजेच 36 तास कायम राहणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे (Mega Block) पश्चिम रेल्वेच्या एकूण 162 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे. त्यामुळे रोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, कांदिवली ते बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, हे काम पूर्ण करण्यासाठीच हा विशेष ब्लॉक घेतला जात आहे.

कामाच्या दरम्यान काही गाड्यांना बदललेल्या मार्गावर वळवले जाणार आहे, तसेच काही गाड्यांची सेवा लवकर थांबवली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, प्रवासाच्या आधी अपडेटेड वेळापत्रक तपासण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Veer Savarkar Sanskar Shala : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनोखा उपक्रम)

प्रवाशांनी काय लक्षात घ्यावं?
  • शनिवार, दि. 31 मे दुपारी 2 पासून ब्लॉक सुरू
  • रविवार, दि. 1 जून मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ब्लॉक
  • एकूण 36 तास सेवेत अडथळा
  • 162 लोकल गाड्या रद्द
  • काही गाड्यांचे मार्ग व वेळा बदलले

मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवासावर या ब्लॉकचा (Mega Block) मोठा परिणाम होणार असल्याने, नागरिकांनी आपल्या प्रवासाची योजना योग्य प्रकारे आखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.