वेंगुर्ले-वायंगणी किनाऱ्यावर २५ आणि २६ मार्चला ‘कासव महोत्सव’

148

सावंतवाडी वनविभागाच्या वतीने २५ आणि २६ मार्च या कालावधीत वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी बीच येथे ‘कासव महोत्सव वायंगणी २०२३‘चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सावंतवाडी उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, सिधुदुर्गचे मानद वन्यजीव रक्षक नागेश दप्तरदार हे उपस्थित राहणार आहेत.

२५ मार्चचा कार्यक्रम 

२५ मार्च रोजी सकाळी ७.४५ वाजता नवजात समुद्री कासव पिल्लांना मान्यवरांच्या हस्ते नैसर्गिक अधिवासांत सोडणे, ८.३० वाजता उद्घाटन, ९.४५ वाजता मांडवी खाडी येथे कांदळवन सफर, ११ वाजता कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शन, १२.३० वाजता कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कासव मित्रांचा सन्मान, सायंकाळी ५ वाजता कासव संवर्धनाबाबत मार्गदर्शनपर चित्रफित, ५.३० वाजता कांदळवन कक्षाच्या दुर्गा ठिगळे यांचे कांदळवन संवर्धनाबाबत मार्गदर्शन, ७.३० वाजता ‘कुर्म अवतार‘ हा पौरार्णिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.

२६ मार्चचा कार्यक्रम

तसेच २६ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता नवजात समुद्री कासव पिल्लांना नैसर्गिक अधिवासांत सोडणे, ८.३० वाजता वायंगणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिम, ९.३० वाजता कोंडुरा डोंगरावर नेचर ट्रेल, सकाळी ११ वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ वनपरिक्षेत्राचे अधिकारी अमृत शिंदे, मठ वनपाल सावळा कांबळे, मठ वनरक्षक सूर्यकांत सावंत यांनी केले आहे.

(हेही वाचा – केंद्र सरकार सतर्क! कोरोनाचा वाढता धोका, आरोग्य मंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.