BEST Initiative : गणेश मूर्ती मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे प्रकाशमय

मुंबईकरांच्या माहितीसाठी बेस्ट उपक्रमाच्या मार्गप्रकाश विभागातर्फे एक माहितीपुस्तिका सोमवार २८ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली.

116
BEST Initiative : गणेश मूर्ती मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे प्रकाशमय
BEST Initiative : गणेश मूर्ती मिरवणूक मार्ग, विसर्जन स्थळे प्रकाशमय

दरवर्षी बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाकडून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मिरवणूक मार्ग विसर्जन स्थळे या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या निर्देशानुसार प्रकाश योजना केली जात असते. यंदाही मुंबई शहरात गणेशभक्तांसाठी ७१ मिरवणूक मार्ग, २० विसर्जन स्थळे आणि ३९ कृत्रिम तलाव येथे २२९६ दिवे लावण्याची प्रकाश योजना बेस्ट उपक्रमाच्या वतीने करण्यात येत आहे. मुंबई शहर हद्दीत साजरा करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच मुंबईकरांच्या माहितीसाठी बेस्ट उपक्रमाच्या मार्गप्रकाश विभागातर्फे एक माहितीपुस्तिका सोमवार २८ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली.

बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने महानगरपालिकेच्या निर्देशानुसार मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळांवरील प्रकाश योजनेची सुरक्षततेच्या दृष्टीने आखणी केलेली आहे. बेस्ट उपक्रमाने मुंबई शहरात गणेशभक्तांसाठी ७१ मिरवणूक मार्ग २० विसर्जन स्थळे आणि ३९ कृत्रिम तलाव येथे २२९६ दिवे लावण्याची प्रकाश योजना केलेली आहे विसर्जन स्थळांवर सुयोग्य प्रकाश व्यवस्थेकरिता एकूण १५ स्थायी विद्युत मनोऱ्यांची उभारणी करण्यात येत आहे. तसेच मोठया गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विसर्जन स्थळांवर पर्यायी वीज पुरवठयाकरिता एकूण ८ डिझेल जनित्र संचाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Electric Double Decker Bus : बेस्टच्या ताफ्यात आणखी ४ वातानुकूलित दुमजली बस)

समुद्रात विसर्जन करताना आपत्कालीन प्रसंग उद्भवल्यास बुडणाऱ्यांना वाचविण्यासाठी जीवरक्षक दलास मदत म्हणून समुद्रात खोलवर प्रकाश पोहोचण्यासाठी एकूण १९ उच्च क्षमतेचे झोत असलेले शोधप्रकाश (सर्चलाईट) दिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. विसर्जन स्थळांवरील वीज पुरवठा सुरळीत व अखंडपणे चालू ठेवण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

विद्युत रोषणाईसाठी गणेशोत्सव मंडळांना तात्पुरता विजपुरवठा मिळण्यासाठी अर्जदारांनी पूर्ण करावयाच्या नियम व अटींच्या सर्व सुचना तसेच बेस्टच्या मार्गप्रकाश विभागाने मिरवणूक मार्गावरील व विसर्जनस्थळावरील प्रकाश योजनेची माहिती आणि गणेश भक्तांसाठीची बस वाहतूक व्यवस्था यासंदर्भात संपूर्ण माहिती माहितीपुस्तिकेच्याद्वारे प्रदर्शित केलेली आहे. सदर पुस्तिका बेस्ट उपक्रमाच्या वेबसाईटवर (www.bestundertaking.com) देखील उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे बेस्ट उपक्रमाने स्पष्ट केले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.