राज्यात १२१ Ola Showroom होणार बंद; नेमकं काय कारण? वाचा

130
राज्यात १२१ Ola Showroom होणार बंद; नेमकं काय कारण? वाचा
राज्यात १२१ Ola Showroom होणार बंद; नेमकं काय कारण? वाचा

Ola Showroom : ओला इलेक्ट्रिक अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. ग्राहकांच्या तक्रारींमुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील ओला डिलरशिपवरील कारवाई (Ola Delership Action) आणखी तीव्र करण्यात आली आहे. एका इंग्रजी समूहाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र सरकारने आरटीओ विभागाला (RTO Deptt) वैध व्यापार प्रमाणपत्राशिवाय कार्यरत असलेल्या सर्व ओला इलेक्ट्रिक डिलरशिप बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या अहवालानुसार, सुमारे १२१ ओला इलेक्ट्रिक शोरूम बंद (Electric showroom closed) करण्यात आले आहेत आणि १९२ स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.  (Ola Showroom)

(हेही वाचा – बेजबाबदार विधाने करू नका; वीर सावरकर अवमानप्रकरणी Rahul Gandhi यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले)

१२१ ओला इलेक्ट्रिक शोरूमकडे व्यापार प्रमाणपत्र नाही
ओला इलेक्ट्रिक महाराष्ट्र सरकारसोबत वादात अडकली आहे. राज्याच्या संयुक्त वाहतूक आयुक्तांनी 16 एप्रिल 2025  रोजीच्या ईमेलद्वारे महाराष्ट्र आरटीओला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिकविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, आरटीओने महाराष्ट्रातील सुमारे १४६ ओला इलेक्ट्रिक स्टोअर्सची तपासणी केली. यामध्ये, १२१ डिलरशिपकडे केंद्रीय व्यापार प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले, जे तपासणी केलेल्या डिलरशिपपैकी ८२.८७ टक्के आहे. यापैकी ७५ शोरुम बंद करण्यात आले आहेत. तसेच, १९२ इलेक्ट्रिक स्कूटर जप्त करण्यात आल्या आहेत.

(हेही वाचा – ISRO चे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांचे निधन !)

ओलाच्या दुकानावर ४ वेळा टाकण्यात आले छापे

  • ८ मार्च – देशभरातील अनेक ओला स्टोअर्सवर छापे टाकण्यात आले. व्यापार प्रमाणपत्र (Trade Certificate) नसल्यामुळे अनेक दुकाने सील करण्यात आली आणि इलेक्ट्रिक वाहने जप्त करण्यात आली. 
  • १२ मार्च – मध्य प्रदेशातील जबलपूरमधील २ दुकानांवर आरटीओने छापे टाकले. या काळात वाहतूक अधिकाऱ्यांनी १४ इलेक्ट्रिक वाहने जप्त केली. 
  • १८ मार्च – इंदूरमध्ये ४ दुकानांवर छापे टाकले. व्यापार प्रमाणपत्र नसल्यामुळे कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. 
  • १७ ते १९ मार्च – महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे २६ दुकानांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये ३६ वाहने जप्त करण्यात आली आणि त्यांना नोटिस देण्यात आल्या आहेत.

इतर कंपन्यांच्या तक्रारीनंतर कारवाई
गुरुग्रामस्थित प्रताप सिंग अँड असोसिएट्स कंपनीने (Pratap Singh & Associates Company) ओला इलेक्ट्रिक आणि इतर काही कंपन्यांविरुद्ध व्यापार प्रमाणपत्र नसल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर महाराष्ट्र परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.