अकरावी प्रवेश अर्ज प्रक्रिया ३० मे पासून सुरु होणार

86

अकरावी प्रवेशासाठी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे सुधारिक वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालयाने प्रसिद्ध केले आहे. यानुसार ३० मे पासून अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग-१ भरता येणार आहे.

( हेही वाचा : महापालिकेच्या सर्व विभागांमध्ये मुंबईकरांना मिळणार योगाचे धडे!)

यासाठी विद्यार्थ्यांना भाग-१ भरण्यापूर्वी २३ ते २७ मे या कालावधीत अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे. भाग-१ भरून पासवर्ड सेट केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व फेरीच्यावेळी अर्जाचा भाग-२ भरावा लागणार आहे.

वेळापत्रक

  • विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर नोंदणी सराव – २३ ते २७ मे
  • ऑनलाइन नोंदणी व प्रवेश अर्ज भाग-१ भरणे लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवणे – ३० मे पासून पुढे
  • भाग-२ भरण्यासाठी दहावीच्या निकालानंतर तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.
  • अर्जाचा भाग १ भरल्यानंतर निकाल जाहीर होईपर्यंत कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया राबवली जाईल. तर निकाल जाहीर झाल्यावर प्रवेश अर्जाचा भाग दोन भरून, महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे, गुणवत्ता यादी जाहीर करणे, प्रत्यक्ष प्रवेश देणे आदी प्रक्रिया होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.