प्रतिनिधी
महाराष्ट्रातील दहावीच्या निकालानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने अकरावीच्या केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १९ मेपासून सुरू केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती या पाच विभागांमध्ये ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रवेशासाठी उत्साहाचे वातावरण आहे. (11th Admission 2025)
(हेही वाचा – Jyoti Malhotra, प्रियंका सेनापतीनंतर ‘या’ नव्या युट्यूबरचा चेहरा वादाच्या भोवऱ्यात !)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक (SSC) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी (HSC) संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 11thadmission.org.in या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. प्रक्रियेचा पहिला टप्पा (पार्ट १) सोमवारपासून सुरू झाला असून, यात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. दुसरा टप्पा (पार्ट २) मध्ये विद्यार्थ्यांना पसंतीच्या महाविद्यालयांची निवड करावी लागेल. प्रवेश प्रक्रिया झीरो राऊंड, तीन नियमित फेऱ्या आणि विशेष फेऱ्यांमध्ये विभागली गेली आहे.
नोंदणी शुल्क २५० रुपये असून, ते ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. दहावीच्या गुणवत्तेनुसार आणि आरक्षण धोरणानुसार जागांचे वाटप केले जाईल. पहिली गुणवत्ता यादी जून २०२५ मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी शासनाने हेल्पडेस्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना वेळेत नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –