गोवर नियंत्रणासाठी राज्यात लवकरच होणार टास्क फोर्सची स्थापना

90

महाराष्ट्रातील गोवर आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ११ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना करण्यात येत आहे. ज्याप्रकारे कोरोना काळात टास्क फोर्सने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लक्ष दिले होते. त्याच धर्तीवर गोवर साथीच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची ११ सदस्यीय पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.

( हेही वाचा : आणखी एक आफताब! आधी प्रेयसीला गोळ्या घालून ठार केले नंतर जंगलात फेकले, नेमके काय आहे प्रकरण?)

यामध्ये आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असतील. याशिवाय अन्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. टास्क फोर्सच्या स्थापनेनंतर वेळोवेळी बैठका होतील आणि वाढती रुग्णसंख्य नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

मुंबईसह ठाणे, भिवंडी, नाशिक, मालेगावसह औरंगाबादमध्ये गोवरचे रुग्ण आढळले आहे. गोवर रुग्णांच्या संख्येने राज्यभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर साथीचा सर्वाधिक फैलाव मुंबईत झाला आहे. मुंबईत गोवर रुग्णांची संख्या ३४६ आहे. तर संशयित रुग्णांची संख्या ४,३५५ वर पोहोचली आहे. यापैकी ११७ बाळांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, १६ बालके ऑक्सिजन सपोर्टवर असून ४ जण आयसीयूत आणि ३ बालके व्हेंटिलेटरवर आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.