Panvel मधील गिरणी कामगारांच्या संकुलातील 11 इमारतींना दिली ‘या’ गिरणींची नावे

79

Panvel : रायगड जिल्ह्यातील पनवेल भागात कोन येथिल गिरणी कामगार संकुलात (Panvel Mill Workers Complex) एकता समितीच्या वतीने 1 मे, कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संकुलाअंतर्गत येणाऱ्या 11 इमारतींना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली आहेत. गिरण्या बंद पडल्या आणि गिरणी कामगार देशोधडीला लागला. त्यामुळे मुंबईतील गिरणी कामगार मुंबईच्या बाहेर फेकला गेला. गिरणी कामगार हा मुंबईचा कणा होता. आणि गिरण्यांमुळेच त्याचा उदरनिर्वाह होत होता. याची आठवण म्हणून संकुलतील 11 इमारतीना 11 गिरण्यांची नावे देण्यात आली. तसेच संकुलच्या भिंतीवर गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारे कायमस्वरूपी भित्तीचित्र लावण्यात आले आहे. (Panvel)

(हेही वाचा – Mumbai T20 League : टी-२० मुंबई लीगमध्ये पृथ्वी शॉ आयकॉन खेळाडू; सूर्यकुमार, श्रेयस अय्यरचाही समावेश)

कशी झाली नावांची निवड?
एकूण 40 ते 65 गिरण्यांची नावे समोर होती. त्यातली एक नाव अनेक गिरण्यांना होतं.  काही गिरण्यांच्या नावाचा अर्थ एकच होता. काही नावे गिरणी मालकांची होती. अशी नावे यातून वेगळण्यात आली. एकूण 15 चिट्ठ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 11 नावे देण्यात आली.

कोणत्या गिरणींची नावे?
अपोलो ,इंडिया युनायटेड, कोहिनुर, ,मॉडर्न ,स्वदेशी, स्टँडर्ड, श्रीराम, ज्युपिटर, मुंबई, स्वान, गोल्ड मोहर घरे मिळावीत म्हणून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना अनेक वर्षे संघर्ष करावा लागला. घरे मिळाल्यानंतरही त्यांची स्थिती, मेंटेनेन्स अशा गोष्टींसाठी आम्ही संघर्ष केला. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला मेंटेनन्स माफीचे आश्वासन दिल्याने आमच्यात आनंदाचे वातावरण असल्याचे कार्याध्यक्ष डॉ संतोष सावंत सांगतात. गिरणगाव आणि गिरणी कामगारांचा इतिहास जपण्यासाठी  तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडतील गिरणी कामगारांचे महत्त्वाचे योगदान पुढील भावी पिढीला व्हावे , हा इतिहास जपण्यासाठी कामगार दिनाचे औचित्य साधत हा नामांतर सोहळा केल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष गणेश सुपेकर यांनी दिली.

(हेही वाचा – ATM Cash Withdrawal Rules : १ मे पासून बदलले एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क; आता किती पैसे द्यावे लागणार?)

आता आमच्या इमारती गिरण्यांच्या नावाने ओळखल्या जातील. या निमित्ताने पुढच्या पिढीच्या तोंडी ही नावं आणि आपला इतिहास राहिल. तसेच इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार, वाचनालय यांनाही येत्या काळात गिरणी, कामगार नेते यांची नावे देण्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया कार्याध्यक्ष डॉ. संतोष सावंत यांनी दिली. या कार्यक्रमाला शिवसेना नेते हेमंत खांडेकर, जिल्हाप्रमुख प्रमोद इंगळे, तालुका प्रमुख उदय बहिरा, मनसे नेते योगेश चिले यांची उपस्थिती लाभली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.