Jayant Patil यांच्या ‘या’ एकतर्फी निर्णयावर तरुण नेत्यांमध्ये नाराजीचा सूर

जयंत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत पुनर्नियुक्ती झालेली नसतानाच ते विविध पदांचे वाटप करत असल्याने, त्याविरोधात तरुण नेतृत्व शरद पवारांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे.

62
Jayant Patil यांच्या 'या' एकतर्फी निर्णयावर तरुण नेत्यांमध्ये नाराजीचा सूर
  • प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अंतर्गत आता अंतर्गत असंतोषाचे स्वर चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून (Jayant Patil) पक्षांतर्गत पदांचे वाटप परस्परपणे सुरू असल्याने, अनेक तरुण नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पदवाटपावरून अस्वस्थता; शरद पवारांकडे तक्रारींची तयारी

अजून जयंत पाटलांची (Jayant Patil) प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत पुनर्नियुक्ती झालेली नसतानाच ते विविध पदांचे वाटप करत असल्याने, त्याविरोधात तरुण नेतृत्व शरद पवारांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. या गटात आमदार रोहित पवार यांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – “जर दहशतीचा कणा पुन्हा उभा राहिला तर…” ; PM Modi यांचा पाकला सूचक इशारा)

पारदर्शकतेचा अभाव, निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

पक्षातील काही तरुण नेत्यांनी आक्षेप घेतला आहे की, जयंत पाटलांकडून (Jayant Patil) कोणत्याही सल्लामसलतीशिवाय पदांची नावे जाहीर केली जात आहेत. यामुळे पक्षातील अंतर्गत लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

शरद पवारांसमोर नव्या आव्हानांची मालिका

शरद पवारांना पक्षात गटबाजी, असंतोष आणि निर्णयप्रक्रियेतील अपारदर्शकता यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. लोकसभा निवडणुकांनंतर पक्ष पुनर्गठनेच्या तयारीत असताना, अशा अंतर्गत नाराजीमुळे संघटनात्मक कामकाजात अडथळे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(हेही वाचा – महत्त्वाच्या पालिकांसाठी महायुतीचा ‘नो रिस्क’ फॉर्म्युला; BJP स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम)

‘आम्ही थांबणार नाही’ – काही युवा नेत्यांचा स्पष्ट इशारा

सूत्रांच्या माहितीनुसार, तरुण नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, जर निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता नसेल, तर ते थेट शरद पवारांच्या समोर आपली भूमिका मांडणार आहेत. पवारांकडून योग्य हस्तक्षेप आणि समुपदेशनाची अपेक्षा या तरुण नेतृत्वाकडून आहे. राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे की जयंत पाटलांच्या (Jayant Patil) निर्णयशैलीमुळे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात नव्या अंतर्गत उलथापालथी सुरू होणार आहेत काय? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.