उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरमधील ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र उत्पादन युनिटचे ऑनलाइन माध्यमातून उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) या कार्यक्रमात उपस्थित होते. तसेच या युनिटची रचना दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी करण्यात आली आहे.
“दहशतवादाला चिरडून टाकण्याची वेळ आली आहे”
या कार्यक्रमात जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) म्हणाले की, “दहशतवाद हा कुत्र्याचं शेपूट आहे, जे कधीही सरळ होणार नाही. त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठी दोनशे एकर जमीन दिली. आता येथे ब्रह्मोसचे उत्पादन सुरू होईल. तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद पाहिली असेल. जर तुम्ही ती पाहिली नसेल तर घाबरलेल्या पाकच्या नागरीकांना विचारा ब्रह्मोस क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?” असा सवाल ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी उपस्थित केला. आपण सर्वांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण भारत आणि संपूर्ण उत्तर प्रदेशच्या एकत्र या मोहिमेत सामील व्हायचं आहे.
(हेही वाचा – Eknath Shinde : ‘तिकडून इकडे बघण्याची कुणाची…’, पुतळा अनावरणावेळी उपमुख्यमंत्री शिंदे असं का म्हणाले)
दरवर्षी ८० ते १०० क्षेपणास्त्रे तयार करणार
२०१८ च्या जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषदेदरम्यान संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर उपक्रमाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उत्पादन युनिटची घोषणा केली होती. त्यानंतर २०२१ मध्ये त्याची पायाभरणी करण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्रे भारताच्या डीआरडीओ आणि रशियाच्या एनपीओ माशिनोस्ट्रोयेनिया यांनी संयुक्तपणे विकसित केली आहेत आणि ती भारताच्या संरक्षण प्रणालीसाठी महत्त्वाची मानली जातात. तसेच लखनौमध्ये सुरू झालेल्या एरोस्पेस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटीमधून दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील. याशिवाय, दरवर्षी १०० ते १५० नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे देखील तयार केली जातील. ही क्षेपणास्त्रे एका वर्षाच्या आत तयार होतील.
आतापर्यंत सुखोई सारखी लढाऊ विमाने फक्त एकच ब्रह्मोस क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकत होती, परंतु आता ते तीन नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असतील. नेक्स्ट जनरेशन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारा क्षमता ३०० किलोमीटरपेक्षा जास्त असेल आणि त्याचं वजन १,२९० किलोग्रॅम असेल, तर सध्याच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २,९०० किलोग्रॅम आहे.
(हेही वाचा – India Pakistan War : एस – ४००, भटिंडा हवाई तळ नष्ट केल्याची दर्पोक्ती; खोटारड्या पाकचा भारताने फाडला बुरखा)
याच कार्यक्रमात, टायटॅनियम आणि सुपर अलॉयज मटेरियल प्लांट (स्ट्रॅटेजिक मटेरियल टेक्नॉलॉजी कॉम्प्लेक्स) चे उद्घाटन देखील करण्यात आले. यामध्ये एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या साहित्याचे उत्पादन समाविष्ट असेल. याशिवाय, संरक्षण चाचणी पायाभूत सुविधा प्रणाली (DTIS) ची पायाभरणी करण्यात आली. संरक्षण उत्पादनांच्या चाचणी आणि प्रमाणनासाठी डीटीआयएसचा वापर केला जाईल. उत्तर प्रदेश सरकारने मोफत दिलेल्या ८० हेक्टर जमिनीवर बांधलेले ब्रह्मोस उत्पादन युनिट साडेतीन वर्षांत पूर्ण झाले.
यावेळी यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये लखनौ, कानपूर, अलीगढ, आग्रा, झाशी आणि चित्रकूटसह सहा नोड्स आहेत. संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. तामिळनाडूनंतर, उत्तर प्रदेश हे अशा प्रकारचा कॉरिडॉर स्थापन करणारे दुसरे राज्य आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community