XI Jinping Not Attending G20 : नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार नाहीत; अमेरिका नाराज

64
XI Jinping Not Attending G20 : नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार नाहीत; अमेरिका नाराज
XI Jinping Not Attending G20 : नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार नाहीत; अमेरिका नाराज

नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 शिखर परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहणार नाहीत, (XI Jinping Not Attending G20) असे चीनने स्पष्ट केले आहे. त्यांच्याऐवजी राज्य परिषदेचे पंतप्रधान ली कियांग उपस्थित राहतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी घोषित केले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी याविषयी एक संक्षिप्त निवेदन प्रसारित केले आहे.

शी जिनपिंग G20  शिखर परिषदेपासून दूर का राहिले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. G20  शिखर परिषदेला ते अनुपस्थित राहण्याची त्यांची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्येही त्यांनी इटलीमध्ये झालेल्या G20 शिखर परिषदेत भाग घेतला नव्हता. कोविड-19 रोखण्यासाठी चीनने घातलेल्या निर्बंधांमुळे तो त्यात सहभागी होऊ शकला नाही, असे त्या वेळी सांगण्यात आले होते.

(हेही वाचा – Apmc Market : वातावरणातील वाढत्या उष्णतेचा पालेभाज्यांवर परिणाम, भाज्या सुकून खराब होण्याचे प्रमाण वाढले)

भारताचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढत असल्याचे चीनला त्रासदायक 

काही तज्ज्ञांचे मत आहे की, जिनपिंग यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या G20 परिषदेपासून दूर राहणे हा चीनच्या कट-कारस्थानांचा एक भाग असू शकतो. परराष्ट्र व्यवहार विशेषत: काश्मीर मुद्द्यावरील तज्ज्ञ असलेल्या ज्येष्ठ भारतीय पत्रकार आरती टिक्कू यांनी एका वृत्तवाहिनीशी केलेल्या संवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ‘चीन स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत आहे आणि विस्तारवादाचे धोरण अवलंबत आहे. जी-20 परिषदेनंतर भारत एक नवीन शक्ती म्हणून उदयास येत आहे. ही वस्तुस्थिती चीनसाठी त्रासदायक बनली आहे.

भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे जिनपिंग यांनी G20 मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे’, असे आरती टिक्कू यांनी स्पष्ट केले आहे. गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या घुसखोरीनंतर चीन-भारत संबंध खूपच तणावपूर्ण बनले होते. अलीकडेच चीनने नवा नकाशा जारी करून भारताचा काही भाग स्वतःच्या नकाशात दाखवल्यामुळे दोन्ही दोघांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. (XI Jinping Not Attending G20)

जो बायडेन यांची निराश झाल्याची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनच्या या निर्णयामुळे आपण निराश झालो आहोत, अशी प्रतिक्रिया दिली. ‘जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे अपेक्षाभंग झाला आहे, परंतु मी त्यांना भेटणार आहे’, असे बायडेन यांनी स्पष्ट केले. यापूर्वी जो बायडेन यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी नवी दिल्ली येथील परिषदेला उपस्थित रहावे, यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या परिषदेला जो बायडेन यांच्यासह जागतिक स्तरावरील २४ नेते उपस्थित राहणार आहेत.  (XI Jinping Not Attending G20)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.