जगातील सर्वात मोठा स्टील प्लांट ‘या’ जिल्ह्यात तयार होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Mann Ki Baat मध्ये केला उल्लेख

130
Mann Ki Baat : रविवारी २५ मेला मन की बातच्या १२२ व्या भाग रेडिओवरुन प्रसारित करण्यात आला. यावेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि ऑपरेशन सिंदूरबद्दलही भाष्य केले. तसेच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील काटेझारी गावाचा उल्लेख केला, जिथे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची एसटी बस पोहोचली आहे. तिथे गावातील लोकांनी एसटी बसचे वाजत गाजत स्वागत केलं, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केला. (Mann Ki Baat)

(हेही वाचा – ओव्हर स्पीडबद्दल MSRTC च्या चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल)

दरम्यान याच गडचिरोली जिल्ह्यात फेब्रुवारी २०२५ मध्ये JSW ग्रुपने जगातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटची घोषणा केली होती. त्याची क्षमता २५ दशलक्ष टन इतकी असेल.तसेच गडचिरोलीतील उच्च दर्जाचे लोहखनिज भारताला जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे लोहखनिज उत्पादक देश बनण्यास  मदत होणार आहे. यामुळे भारताची पोलाद उत्पादन क्षमता कशी वाढेल तसेच आयातीवरील अवलंबित्व कसे कमी होईल.

रविवारच्या मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विषयांवर भाष्य केले. यामध्ये छत्तीसगडमध्ये झालेल्या बस्तर ऑलिम्पिक आणि माओवादग्रस्त भागातील विज्ञान प्रयोगशाळांवर चर्चा केली आहे. येथील मुलांना विज्ञानाची आवड आहे. तो खेळातही कमाल करत आहे. अशा प्रयत्नांवरून या भागात राहणारे लोक किती धाडसी आहेत हे दिसून येते. या लोकांनी सर्व आव्हानं असूनही आपलं जीवन सुधारण्याचा मार्ग निवडला आहे” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.


(हेही वाचा –MSRTC ला इलेक्ट्रिक बस वेळेवर न पुरविणाऱ्या कंपनीवर अखेर कारवाई नाहीच)

“गेल्या पाच वर्षांत गुजरातमधील गीरमध्ये सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ झाली आहे. सिंहगणनेनंतर समोर आलेली सिंहांची ही संख्या खूप उत्साहवर्धक आहे. गुजरात हे पहिलं राज्य बनलं जिथे महिलांना वन अधिकाऱ्यांच्या पदावर मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आलं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये म्हटलं आहे.

हेही पहा –

 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.