Uddhav Thackeray : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेना उबाठासोबत (Shivsena UBT) युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या ‘या’ प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमच्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. फक्त माझ्यासोबत येऊन महाराष्ट्राचं हित पाहायचं की भाजपासोबत जाऊन हित पाहायचं, याची स्पष्टोक्ती झाली पाहिजे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले. (Uddhav Thackeray)
(हेही वाचा – Uddhav Thackeray : वक्फ बोर्डाच्या विधेयकास विरोध का केला ? उद्धव ठाकरे म्हणाले …)
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, “मराठीच्या हितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी मीही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. मराठीच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं मीदेखील आवाहन करत आहे. पण आमची फक्त एक अट आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आधीही आम्ही सांगत होतो की, महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे हे गुजरातला घेऊन चालले आहेत. तेव्हाच जर त्यांना विरोध केला असता तर आज जे सरकार दिल्लीत बसलंय ते तिकडं बसलं नसतं. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि पुन्हा तडजोड करायची, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही, हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा,” असं उद्धव यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.
“बाकी आमच्यातील भांडणं, जी काही भांडणं कधी नव्हतीच, तीही आजपासून मिटवून टाकली चला. महाराष्ट्राच्या हितासाठी मग सर्व मराठी माणसांनी ठरवायचं की, भाजपासोबत जायचं की माझ्या शिवसेनेसोबत यायचं. पण आधी ठरवा की, कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठी आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे. हे आधी ठरवा आणि मग जो काही पाठिंबा द्यायचा असेल, विरोध करायचा असेल तो बिनशर्त द्या, माझी काही हरकत नाही. महाराष्ट्राचं हित ही एकच अट आहे माझी. पण एकदा सोबत आल्यानंतर बाकीच्या चोऱ्यांच्या गाठीभेटी घ्यायच्या नाहीत आणि त्यांचा प्रचार करायचा नाही. याबाबत आधी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यायची आणि त्यानंतर आम्हाला टाळी द्यायची,” अशी भूमिकाही उद्धव ठाकरेंनी मांडली आहे.
(हेही वाचा – भारतीय विद्यार्थीनीचा अमेरिकेत Hit and Run अपघातात मृत्यू ! स्वप्नपूर्ती होण्याआधीच …)
दरम्यान, अभिनेते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar Podcast) यांना राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदे यांचे राजकारण, उद्धव ठाकरेंशी युती, भाजपाशी जुळत असलेले सूर आदी विषयांवर राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. मुंबई महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या या विषयची सर्वत्र चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर लगोलग भूमिका स्पष्ट केली. दादरच्या शिवाजी महाराज स्मृती मंदिरमधून कामगार सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आता ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मार्ग मोकळा होता का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा –