पहलगाम येथे झालेल्या निष्पाप भारतीयांच्या मृत्युचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) करून घेण्यात आला. इथे हे युद्ध थांबणार नसून ‘पिक्चर तो अभी बाकी है’ असे म्हणत लष्कर प्रमुखांनी पुढील कारवाईचे सुतोवाच करून ठेवले आहे. यात ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव अतिशय समर्पक ठेवले आहे. कारण पहलगाम येथील हल्ल्यात भारतीय कुटुंबातील कुटुंब प्रमुखांना अर्थात कर्त्या पुरुषाला मारून स्त्रीयांचे सिंदूर अर्थात सौभाग्य उजाडण्याचे धाडस दहशतवाद्यांनी केले. या ‘सिंदूर’चे महत्त्व त्यांनाच माहिती, ज्यांनी आपले प्रियजन गमावले. (Operation Sindoor)
Jai Hind pic.twitter.com/sQeMP4xwpY
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
यापुढे महिलेचे कुंकू पुसण्याची हिंमत केली तर …
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या पतींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ‘मिशन सिंदूर’ ठेवण्यात आले. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. यापुढे दहशतवाद्यांनी कोणत्याही महिलेचे कुंकू पुसण्याची हिंमत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल हा स्पष्ट संदेश या प्रत्युत्तरातून दिला आहे. (Operation Sindoor)
What an inspiring name, “Sindoor”🇮🇳🇮🇱
— Kobbi Shoshani 🇮🇱 (@KobbiShoshani) May 7, 2025
“अभी पिक्चर बाकी है”
इस्रायलचे महावाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी ट्विट करत ‘किती प्रेरणादायी नाव आहे, “सिंदूर” ‘ असं म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचे तळ क्षेपणास्त्र हल्ल्यांद्वारे उद्ध्वस्त केले. या नंतर निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी सूचक ट्विट केले आहे. त्यांनी एक्स या समाज माध्यमावर “अभी पिक्चर बाकी है”, असे सूचक ट्विट केले आहे. (Operation Sindoor)
Abhi picture baki hai…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 7, 2025
हेही पहा-
Join Our WhatsApp Community