Milind Deora : जम्मू-काश्मीर येथील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी आतंकवादी हल्ला (Pahalgam terrorist attack) झाला. या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २६ जणांचा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान भारत आणि पाकिस्तानचे सध्या वातावरण तणावग्रस्त आहे. अशातच आता शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरेंवर खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान, इस्टाग्रामवरील (Milind Deora Instagram post) एका पोस्टमध्ये देवरा यांनी लिहिले की, ठाकरे ‘राष्ट्रपुत्रांपासून ते भारताच्या पर्यटकांपर्यंत’ इतके खालच्या पातळीवर गेले आहेत. पहलगाममध्ये गोळीबार सुरू असताना उद्धव ठाकरे युरोपमध्ये सुट्टी घालवत होते. तसेच, महाराष्ट्र दिनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही न बोलता गायब झाले. असा हल्लाबोल मिलिंद देवरा यांनी केला आहे. (Milind Deora)
(हेही वाचा – सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी केंद्र शासन कठोर कायदा करणार; केंद्रीय मंत्री Ashwini Vaishnav यांची माहिती)
दरम्यान शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांच्या या टीकेवर उद्धव ठाकरेंकडून कोणतेही प्रतिउत्तर आलेले नाही. खरंतर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे नुकतेच युरोपला सुट्टीसाठी गेले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे देखील त्यांच्या कुटुंबासह युरोपला गेले. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, युरोपमध्ये एकत्र येण्याबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते.
महाराष्ट्राच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर जाण्याचा शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निर्णय राजकीय वादाचा विषय बनला आहे. मुंबईत झालेल्या भव्य समारंभात त्यांच्या अनुपस्थितीवरही सत्ताधारी महायुतीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यातील इतर राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने बाहेर पडले असताना, शिवसेना उबाठाचे उद्धव ठाकरे अनुपस्थित होते.
(हेही वाचा – Pahalgam terror attack : भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका; पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरात आता ‘नो एंट्री’ )
दुसरीकडे, राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये एक विधान दिले होते. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्राच्या अस्तित्वासमोर हे सर्व भांडणे लहान वाटतात. हे एकत्र येणे कठीण गोष्ट नाही, पण इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. यानंतर राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होऊ लागला की, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत का?
राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या विधानावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले होते की, ते छोटे वाद मिटवण्यास तयार आहोत, परंतु त्यांनी राज ठाकरेंसमोर एक अटही ठेवली आहे. ते म्हणाले की, जो महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात असेल त्याला घरी बोलावून जेवू घातले जाणार नाही. एका कार्यक्रमादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मराठी एकतेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हात पुढे करत एक मोठे विधान केले होते. उद्धव म्हणाले होते की, मराठी आणि महाराष्ट्रासाठी जे काही निरर्थक भांडणे आहेत, ती मी संपवण्यास तयार आहे.
(हेही वाचा – Jharkhand : ‘मी माझ्या मुलांना काय सांगू?’, दक्षिण आफ्रिकेतील नायजरमध्ये भारतीय कामगारांचं अपहरण)
मी सर्व मराठी लोकांना महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही म्हटले होते की महाराष्ट्राचे उद्योग आणि व्यवसाय गुजरातमध्ये जात आहेत. जर तुम्ही (राज ठाकरे) त्यावेळी विरोध केला असता तर आज केंद्रात सत्तेत असलेले सरकार सत्तेत नसते. आम्ही केंद्रात असे सरकार स्थापन केले असते जे महाराष्ट्राचे हित समजून घेत असते. शिवाय, राज्यात असे सरकार असते. जे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करते. आपण कामगार कायद्यांसारखे काळे कायदे मुळापासून उखडून टाकले असते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कधी समर्थन, कधी विरोध, कधी तडजोड – हे धोरण आता चालणार नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community